मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सुरू होणार प्रेमाचा नवा आध्याय; सायालीसाठी अर्जुन करणार हरतालिकेचा उपास!

Tharala Tar Mag: सुरू होणार प्रेमाचा नवा आध्याय; सायालीसाठी अर्जुन करणार हरतालिकेचा उपास!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Sep 20, 2023 04:06 PM IST

Tharala Tar Mag 20 September 2023: अर्जुन सायलीसाठी हरतालिकेचा उपास करणार आहे. यातूनच तो आपलं अव्यक्त प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Tharala Tar Mag
Tharala Tar Mag

Tharala Tar Mag 20 September 2023: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेमाचा एक नवा अध्याय पाहायला मिळणार आहे. एकीकडे मधुभाऊंची केस आता पुढेह सरकरणार आहे. तर, दुसरीकडे सायली आणि अर्जुन यांच्या प्रेमाची गाडी देखील पुढे सरकणार आहे. आता अर्जुन देखील सायलीसाठी हरतालिकेचा उपास करणार आहे. यातूनच तो आपलं अव्यक्त प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्जुनने सायलीसाठी उपास ठेवला आहे, हे आता सुभेदारांच्या घरात सगळ्यांनाच कळले आहे. त्यामुळे सगळेच त्याची थट्टा करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अर्जुनने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, हे एव्हाना आता सगळ्यांच्या लक्षात आले आहे. अर्जुनने काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून सगळेच जण प्रयत्न करत आहेत. अर्जुनची आई आणि पत्नी सायली दोघी मिळून अर्जुनने काहीतरी खावं म्हणून त्याच्यासमोर त्याच्या आवडीच्या वेगवेगळ्या पदार्थांची नावं घेणार आहेत. अर्जुनसाठी काय खायला ऑर्डर करूया? फ्रँकी की पिझ्झा... असे बोलून ते अर्जुनला खाण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. मात्र, अर्जुन आता सगळ्यांवर रुसणार आहे. तर, याच रुसव्यात तो आपला उपास असल्याचे सांगून टाकणार आहे.

Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराला तिचे बाबा भेटणार अन् प्रेक्षकांना धक्का बसणार! मालिकेत पुढे काय होणार? वाचा..

आपण सायलीसाठी उपास केल्याचे अर्जुन सांगणार आहे. यावेळी सायली देखील त्याला या उपासाचं कारण विचारणार आहे. तर, सायली तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्यासाठी हा उपास करतोय, असे बोलणार आहे. पण, मी कुठे तुमची बायको आहे?, असा प्रश्न सायली करणार आहे. तर, मी पण तर तुझा खरा नवरा नाही, तरीही तू माझ्यासाठी उपास केलाच आहेस ना? असे अर्जुन म्हणणार आहे. यातून दोघांमधील प्रेम आता अबोल भावनांनी व्यक्त करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सायली आणि अर्जुनचं नातं नवं वळण घेताना दिसत आहे. या नात्यात आता प्रेम फुलू लागले आहे. यामुळे आता दोघांचं खोटे पती-पत्नी असण्याचं हे उसनं आवसान गळून पडणार आहे. असे अनेक क्षण समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघांचे प्रेम दिसून आले होते. मात्र, अजूनही दोघांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव होत नाहीये. आता तरी हे दोघे आपलं प्रेम मान्य करतील का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

WhatsApp channel