लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

Published May 20, 2024 09:27 AM IST

सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांना आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत असल्याची आठवण तर करून दिली आहे. मात्र, दोघांमधील दुरावा आता त्यांना सहन होत नाहीये.

लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव!
लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव!

ठरलं तर मग’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. या मालिकेत रोज नवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. आता मालिकेत चांगलंच रंजक वळण पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. सायली आणि अर्जुनला खास सरप्राईज देण्यासाठी कल्पना आणि सुभेदार कुटुंबाने एक सेलिब्रेशन पार्टी ठेवली आहे. मात्र, सायली किंवा अर्जुन यांना याची काहीही कल्पना नाही. दुसरीकडे एक वर्षानंतर आता सायली आणि अर्जुन यांच्यातील लग्नाचा करार संपणार आहे. हा करार संपणार असल्यामुळे दोघेही दुःखी झाले आहेत.

सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांना आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत असल्याची आठवण तर करून दिली आहे. मात्र, दोघांमधील दुरावा आता त्यांना सहन होत नाहीये. सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तरी, त्यांनी अद्याप दोघांनी एकमेकांना याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे दोघांच्या मनातील भावना अजूनही अव्यक्तच राहिल्या आहेत. याला कारण त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधला एक क्लॉज देखील आहे. परंतु, आता लग्नाचा करार संपत आल्यावर सायली तिच्या मनातील भावना कुसुम ताईसमोर व्यक्त करणार आहे. सायलीला असं वाटत आहे की, ती एकतर्फी प्रेमात पडली आहे आणि अर्जुनच्या मनात तिच्याबद्दल काहीही नाही.

‘आरआरआर’ गाजवणाऱ्या ज्युनियर एनटीआरचं खरं नाव माहित आहे का? कसं मिळालं त्याला आजोबांचं नाव? वाचा...

सायलीने कुसुमसमोर दिली प्रेमाची कबुली!

तर, दुसरीकडे अर्जुनला देखील असं वाटत आहे की, सायलीच्या मनात त्याच्याबद्दल कोणतीही भावना नाही. मात्र, दोघेही एकमेकांवर प्रेम करत आहेत. आता सायली कुसुमताई समोर आपल्या मनातील सगळ्या भावना सांगून टाकणार आहे. मात्र, यावेळी कुसुम सायलीला म्हणते की, ‘मी तुला आधीच सांगितलं होतं या माणसांमध्ये गुंतून जाऊ नकोस. तू तुझ्या स्वभावामुळे अर्जुन आणि त्याच्या माणसांमध्ये गुंतून गेली आहेस. मात्र, सायली कुसुमला म्हणते की, ‘मी यांच्यात माझ्या स्वभावामुळे नाही. तर, अर्जुन सरांच्या स्वभावामुळे प्रेमात पडले आहे. ते नेहमी माझी काळजी घेतात. माझं हे प्रेम एकतर्फी आहे आणि ते तसचं राहिल.’

सायलीचं एकतर्फी प्रेम

अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सायलीने कुसुम ताईसमोर बोलते की, ‘कुसुमताई माझ्यासमोर कुठलीही अडचण येवो, अर्जुन सर माझ्यासमोर ढालीसारखे माझ्यामागे ठाम उभे राहतात. ते नेहमी माझी खूप काळजी घेतात. आता इतके दिवस झाले आम्ही या एकाच खोलीत राहत आहोत, पण त्यांनी कधी कुठली मर्यादा ओलांडली नाही. मला अवघडल्यासारखे वाटेल अशीही वागणूक त्यांनी कधी दिली नाही. त्यांनी दूर राहून माझी नेहमीच काळजी घेतली. त्यांनी हे सगळं केलं कारण ते एक माणूस म्हणूण् खूपच चांगले आहेत.’

Whats_app_banner