Tharala Tar Mag: सायलीला अश्रू अनावर! अर्जुन पुसणार डोळे; ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये नेमकं काय झालं?-tharala tar mag 20 august 2024 serial update sayali cries after pratima aatya hug her tightly ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायलीला अश्रू अनावर! अर्जुन पुसणार डोळे; ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये नेमकं काय झालं?

Tharala Tar Mag: सायलीला अश्रू अनावर! अर्जुन पुसणार डोळे; ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये नेमकं काय झालं?

Aug 20, 2024 02:57 PM IST

Tharala Tar Mag 20 August 2024 Serial Update:प्रतिमा आत्यांना त्यांच्या आठवणी परत मिळाव्यात आणि त्या आपल्या कुटुंबात आनंदाने राहाव्यात म्हणून सायली शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे.

Tharala Tar Mag 20 August 2024 Serial Update
Tharala Tar Mag 20 August 2024 Serial Update

Tharala Tar Mag 20 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अतिशय भावनिक बंध पाहायला मिळणार आहेत. प्रतिमा आत्या आता स्वतःहून आपल्या जुन्या आठवणी आणि भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायली त्यांना त्यांच्या या प्रवासात साथ देत आहे. सायली प्रतिमा आत्यांना अगदी स्वतःच्या आईप्रमाणे मानत आहे. खरं तर, सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रतिमा आत्या ही तिची खरी आई आहे. मात्र, दोघीही या सत्यापासून अनभिज्ञ आहेत. दोघींनाही याविषयी काही माहित नाही. तर, प्रिया मात्र खोटी तन्वी बनून सुभेदार कुटुंबात वावरत आहे. आता सायलीला आपल्या भावना अनावर होताना दिसणार आहे.

प्रतिमा आत्यांना त्यांच्या आठवणी परत मिळाव्यात आणि त्या आपल्या कुटुंबात आनंदाने राहाव्यात म्हणून सायली शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. प्रतिमा आत्य देखील सायलीला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम देत आहेत. सायलीने प्रतिमा आत्यांना सुभेदारांच्या देवघरातील दोन चांदीची नाणी दाखवून त्यांचा भूतकाळ आठवून देण्याचा प्रयत्न केला. प्रतिमा आत्यांनी घरात मोकळेपणाने वावरावं यासाठी सायलीने त्यांना स्वयंपाकघरात आणण्याचा प्रयत्न केला. प्रतिमा आत्यांनी स्वतःच्या हातांनी सगळ्यांसाठी काही पदार्थ बनवले. ते चाखल्यानंतर आता सगळेच खूप खुश झाले होते. ते बघून प्रतिमा आत्यांना देखील खूप बरं वाटलं. 

Tharala Tar Mag: प्रतिमा पहिल्यांदाच कुटुंबासोबत प्रेमानं वागणार; पूर्णा आजीला आनंद होणार! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

सायली करतेय प्रयत्न!

आता सायलीने प्रतिमा आत्यांकडून दारात सुंदर रांगोळी देखील काढून घेतली होती. या रांगोळीच्या डिझाईनमधून तरी त्यांना आपल्या जुन्या आठवणी आठवतील, असं सायलीला वाटत होतं. प्रतिमा आत्यांनी काढलेल्या रांगोळीचं देखील सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं. मात्र, काही केल्या प्रतिमा आत्यांना काहीच आठवत नव्हतं. मात्र, आता त्या स्वतः गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सायलीने घरात गाण्यांची मैफिल आयोजित केली होती. या मैफिलीत संपूर्ण कुटुंब एकत्र बसून छान गाणी गातं होतं. यावेळी सायलीचं गाणं ऐकून प्रतिमा आत्या देखील खोलीतून बाहेर आल्या आणि सायलीला बिलगून रडल्या.

सायलीला अश्रू अनावर!

प्रतिमा आत्यांनी सायलीला मिठी मारताच, तिला देखील आपल्या आईची खूप आठवण आली. आपली आई असती, तर तिचाही स्पर्श असाच असता, असं सायलीच्या मनात आलं. या भावनेन सायलीला अश्रू अनावर झाले आहेत. आता रुममध्ये बसून सायली रडत असताना अर्जुन तिथे पोहोचणार आहे. त्यावेळी अर्जुनला देखील सायलीला आईची आठवण येतेय हे ऐकून बहरून येणार आहे. आता अर्जुन स्वतः सायलीचे डोळे पुसणार आहे. तर, सायलीला देखील आपली आई आठवू लागणार आहे.