Tharala Tar Mag: सायली शुद्धीवर आली पण अर्जुन रागावला! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?-tharala tar mag 2 september 2024 serial update arjun gets angry on sayali after she wakeup from coma ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायली शुद्धीवर आली पण अर्जुन रागावला! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

Tharala Tar Mag: सायली शुद्धीवर आली पण अर्जुन रागावला! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

Sep 02, 2024 01:33 PM IST

Tharala Tar Mag 2 September 2024 : मृत्यूशी झुंज देणारी सायली शुद्धीवर येणार आहे. सायलीला शुद्धीवर आलेलं पाहून आता अर्जुन खूप खूश होणार आहे. मात्र, त्याचवेळी तो सायलीवर रागावणार देखील आहे.

Tharala Tar Mag: ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?
Tharala Tar Mag: ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

Tharala Tar Mag 2 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अर्जुनचा जीव भांड्यात पडणार आहे. जिन्यावरून खाली पडून बेशुद्ध झालेली सायली हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या अंगावर जखम झाली नसली, तरी तिच्या मेंदूला मार लागलेला असू शकतो, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. डॉक्टरांनी सायलीवर उपचार सुरू केले होते. मात्र, तरी ती शुद्धीवर येत नव्हती. यामुळे अर्जुनसोबत सगळेच सुभेदार काळजीत पडले होते. मात्र, आता सगळ्यांनाच हायसं वाटणार आहे. सायली आता शुद्धीवर येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होणार आहे.

सायली आणि प्रियामधील वाद आता टोकाला पोहोचले आहेत. प्रतिमा आत्यांना त्यांच्या आठवणी परत मिळाव्यात आणि आपल्या वडिलांसमान असलेल्या मधुभाऊ यांना आश्रम खुनाच्या खोट्या केसमधून बाहेर पडावेत, म्हणून भरपूर प्रयत्न करत आहे. यासाठी अर्जुन करत असलेल्या प्रत्येक प्लॅनमध्ये सायली सामील होत आहे. प्रियाने सत्य सांगून टाकावे यासाठी अर्जुन आता तिच्याशी मैत्रीचं नाटक करत आहे. मात्र, अर्जुनच्या या नाटकाला खरं समजून प्रिया त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत आहे. सायलीला हे मान्य नसताना देखील ती शांत राहून सगळं सहन करत आहे.

Tharala Tar Mag: सायलीचा जीव धोक्यात, अर्जुनच्या काळजाचं झालं पाणी! ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

प्रियाने दिला होता सायलीला धक्का

दुसरीकडे, सायलीने प्रतिमा आत्यांना शोधून घरी आणलं आहे. गेली २० वर्ष सगळे ज्याची वाट बघत होते, तो क्षण त्यांच्या आयुष्यात आला. प्रतिमा आत्या परतून आल्यामुळे सगळेच सुभेदार खूप खूश झाले. पण, प्रतिमाच्या निमित्ताने आता प्रियाला सुभेदारांच्या घरात शिरली आहे. मात्र, प्रतिमा आत्यांना सगळं आठवलं तर, मी त्यांची मुलगी नाही, हे सत्य उघड होईल या भीतीने तिची बोबडी वळली आहे. यामुळे आता ती प्रतिमा आत्या आणि सायली दोघींनाही त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. यातच तिने सायलीला जिन्यावरून धक्का मारल्यामुळे एक मोठा अपघात घडला होता.

अर्जुन सायलीवर रागवणार

आता मृत्यूशी झुंज देणारी सायली शुद्धीवर येणार आहे. सायलीला शुद्धीवर आलेलं पाहून आता अर्जुन खूप खूश होणार आहे. मात्र, त्याचवेळी तो सायलीवर रागावणार देखील आहे. सायली शुद्धीवर येईपर्यंत अर्जुनचे अक्षरशः रडून हाल झाले होते. मात्र, हीच गोष्ट त्याला सायलीला थेट सांगता येत नाहीये. तरीही तो सायलीवर आपला लटका राग दाखवणार आहे. यातून आता दोघांमधील अव्यक्त प्रेम बहरताना दिसणार आहे.