Tharala Tar Mag 2 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना थरारक कथानक पाहायला मिळणार आहे. सुभेदारांच्या घरात अपमानित झाल्यानंतर प्रिया आता तिच्या घरी परतली आहे. मात्र, घरी आलेल्या प्रियाला सतत कोणीतरी आपला पाठलाग करत आहे, असं वाटत आहे. दुसरीकडे सायली आणि अर्जुन यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आयत्यावेळी अर्जुन आणि सायलीने प्रियाच्या गाडीमधील फाईल बदलून प्रियाला तोंडघाशी पाडलं होतं. प्रियाच्या गाडीतील फाईल बदलली गेल्यामुळे अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तात्पुरतं घरातल्या लोकांसमोर येण्यापासून रोखलं आहे. मात्र, आता आणखी पुढे आपण हे सत्य फार काळ लपवून ठेवू शकणार नाही, याची कल्पना दोघांनाही आलेली आहे.
प्रियाच्या आजच्या वागण्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही आपण आपल्या सत्य घरातल्यांसमोर मांडले पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर सगळं खरं सांगितलं पाहिजे, असं एकमेकांशी बोलताना दिसणार आहेत. सायली आणि अर्जुन यांनी अजूनही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिलेली नाही. याचं कारण मधुभाऊंची केस आहे. मधु भाऊंची केस सुटेपर्यंत अर्जुन किंवा सायली दोघेही कोणाच्याही प्रेमात पडू शकणार नाही किंवा इतर कुणाशी लग्नाचा विचार देखील करू शकणार नाहीत, अशी अट त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्येच टाकण्यात आली होती. त्यामुळे सायली आणि अर्जुन हे दोघेही एकमेकांवरील प्रेम आजपर्यंत व्यक्त करू शकलेले नाहीत. एकीकडे मधुभाऊंनी सुखरूप बाहेर यावं, म्हणून सायली प्रार्थना करत आहे. तर, दुसरीकडे मधुभाऊंची केस लवकरात लवकर सुटावी म्हणजे आपल्याला आपल्या मनातील भावना सायलीला सांगता येतील, असा विचार अर्जुन करत आहे.
सायलीला आवडतं त्याप्रमाणे आता अर्जुन घरा आवरणं, रूम स्वच्छ ठेवणं, स्वतःच्या वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवणं अशा सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तर, सायली देखील त्याला हीच शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करताना दिसतेय. आता अर्जुन सायलीचा विद्यार्थी बनून तिच्याकडून रूम स्वच्छ ठेवण्याचे धडे घेणार आहे. या छोट्याशा गंमतीतून देखील दोघांचा रोमान्स फुलून येत आहे. एकीकडे दोघांचे प्रेम बहरत असताना दुसरीकडे आता प्रिया किडनॅप होणार आहे.
किल्लेदारांच्या घरी परतलेली त्यांची तन्वी अर्थात प्रिया आता किडनॅप होणार आहे. सुभेदारांच्या घरातून परतलेल्या प्रियाला सतत कोणीतरी आपला पाठलाग करत आहे, असा भास होतच होता. या रूममध्ये आपल्याशिवाय कोणीतरी आहे, ते शोधत असतानाच एक अज्ञात व्यक्ती पाठीमागून येऊन प्रियाच्या तोंडावर रुमाल ठेवून, तिला बेशुद्ध करून तिथून घेऊन जाणार आहे. दुसरीकडे, प्रियाची काकी आता तिला शोधण्यासाठी रूममध्ये येणार आहे. मात्र, प्रिया कुठेच दिसत नसल्याने आता घाबरलेली काकी खाली जाऊन सगळ्यांना प्रिया घरात कुठेच दिसत नाहीये, असं सांगणार आहे. त्यामुळे रविराज किल्लेदारांसह नागराजला देखील धक्का बसणार आहे.
संबंधित बातम्या