मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं; सायलीने दिली प्रियाला तंबी! बायकोचं ‘हे’ रूप पाहून अर्जुनही सुखावला

माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं; सायलीने दिली प्रियाला तंबी! बायकोचं ‘हे’ रूप पाहून अर्जुनही सुखावला

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 01, 2024 03:57 PM IST

अर्जुन नाही म्हणत असून सुद्धा प्रिया त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतेय, हे बघितल्यावर सायली चिडणार आहे.

माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं; सायलीने दिली प्रियाला तंबी! बायकोचं ‘हे’ रूप पाहून अर्जुनही सुखावला
माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं; सायलीने दिली प्रियाला तंबी! बायकोचं ‘हे’ रूप पाहून अर्जुनही सुखावला

ठरलं तर मग’ या मालिकेत आता सायलीने अर्जुन एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. त्यांच्यात हळूहळू मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. सायली आणि अर्जुन आता हळूहळू एकमेकांच्या जवळ येत आहेत. पती-पत्नी म्हणून त्यांचं नातं आता नव्याने बहरू लागलं आहे. एकीकडे सायली आणि अर्जुन आता एकमेकांसाठी पती-पत्नीची जबाबदारी खऱ्या अर्थाने निभावण्याचा प्रयत्न करत असताना, प्रिया पुन्हा एकदा अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्या संकटांवर मात करून आता सुभेदारांच्या घरात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.

यावेळी कधीही स्वतःला रंग न लागू देणारा अर्जुन केवळ सायलीसाठी रंगांची उधळण करायला तयार होणार आहे. तर, अर्जुनला रंगपंचमी खेळायला आलेला पाहून प्रिया त्याच्या दिशेने रंग घेऊन धावणार आहे. ‘तू मला रंग लावू नकोस. मी केवळ माझ्या बायकोसाठी इथे आलो आहे’, असं अर्जुन प्रियाला सांगणार आहे. मात्र, प्रियांका अर्जुनचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ‘तुला इथे आणण्याचे प्रयत्न मी केले. त्यामुळे तुला पहिला रंग मीच लावणार’, असं म्हणत प्रिया आता अर्जुनला रंग लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, अर्जुन मात्र प्रियाला तू मला रंग लावू नकोस, असं सांगणार आहे.

नाटकासाठी पडदा उघडला अन् झुरळांनी धुमाकूळ घातला! अतुल परचुरेंचा भन्नाट किस्सा ऐकलात का?

सायली संतापणार!

‘मला पहिला रंग केवळ माझी बायकोच लावणार’, असे देखील अर्जुन यावेळी तो म्हणणार आहे. तर, दोघांपासून दूर उभी असलेली सायली हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहे. अर्जुन नाही म्हणत असून सुद्धा प्रिया त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतेय, हे बघितल्यावर सायली चिडणार आहे. तिचा हात रंग लावायला अर्जुनच्या गालापर्यंत पोहोचणार, इतक्यात सायली तिथे येऊन प्रियाला जोरदार धक्का देणार आहे. सायलीच्या धक्क्याने प्रिया थेट रंगांच्या ताटात जाऊन पडणार आहे.

‘लग्नाच्या पंगतीतून उठायला सांगितलं...’; जुई गडकरीच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्ही ऐकलात का?

अर्जुन मनोमन सुखावला!

‘माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं. उगाच त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा नाही. तू आजही त्यांच्या जवळची नाहीयेस, कालही नव्हतीस आणि उद्याही नसशील. मी त्यांची बायको आहे आणि हा अधिकार केवळ माझा आहे’, अशी तंबी सायली प्रियाला देणार आहे. सायली आपल्याला नवरा म्हणतेय, स्वतःला बायकोची कर्तव्य पूर्ण करत असल्याचं म्हणतेय, हे ऐकून अर्जुन मनोमन सुखावून गेला आहे. आपल्या बायकोचं हे रूप पाहून अर्जुनला आता पुन्हा एकदा सायलीच्या प्रेमात पडावं वाटत आहे.

IPL_Entry_Point