Tharala Tar Mag 19th February 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा चैतन्य आणि अर्जुन यांच्या नात्यातील कुरबुरी पाहायला मिळणार आहे. चैतन्यशी वाद झाल्यानंतर ओक्साबोक्सी रडलेला अर्जुन रात्रभर स्वतःला त्रास करून घेतल्यानंतर देखील सकाळी ऑफिसला गेला आहे. दुसरीकडे, अर्जुनला ऑफिसमध्ये जाताना बघून सायली देखील त्याच्या मागे मागे ऑफिसला गेली आहे. आता अर्जुन ऑफिसला गेल्यावर पुन्हा एकदा त्याची गाठ चैतन्यशी पडणार आहे. पुन्हा एकदा चैतन्य आणि अर्जुनमध्ये तूतू-मैंमै होणार आहे.
चैतन्य देखील आपल्या रोजच्या वेळेप्रमाणे ऑफिसला जायला निघतो. मात्र, साक्षी चैतन्यला घरीच थांबवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन आधीच चिडलेला असताना जर त्याचा राग शांत नाही झाला तर, तू ऑफिसला जाऊन काय करणार आहेस? असा प्रश्न साक्षी चैतन्यला करते. इतकंच नाही तर, साक्षी पुन्हा एकदा अर्जुनच्या विरोधात चैतन्यच्या मनात विष कालवते. चैतन्य आधी अर्जुनशी बोलून सगळ्या गोष्टी सोडवणार असतो. मात्र, साक्षीने पुन्हा मनात विष कालावल्यावर त्याचं मन देखील कलुषित होतं. अर्थात चैतन्य आणि अर्जुनमध्ये पुन्हा मैत्री होऊ नये, यासाठी साक्षी प्रयत्न करते.
आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही ऑफिसमध्ये आल्यावर त्यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगणार आहे. चैतन्यला ऑफिसमध्ये पाहून अर्जुन म्हणणार आहे की, ‘काल जे काही आपल्यात घडलं, त्यात कुणाची चूक आहे, हे तुला कळलंच असेल. आता आपण त्याबद्दल जेवणाच्यावेळी बोलू. साक्षीने तुझा ब्रेन वॉश केला असेल, त्याबद्दलही बोलू.’ आत्र, त्यावेळी काम सुरू न करता चैतन्य सरळ अर्जुनच्या हातात त्याच्या राजीनामा ठेवतो. यासोबत तो आपल्याला तुझ्यासोबत काम करायचे नाही, असे अर्जुनला सागंतो. चैतन्यला वाटत असते की, अर्जुनला त्याच्या आणि साक्षीच्या प्रेमाची किंमत नाही.
अर्जुनने साक्षीवर आरोप केले आहेत. यामुळेच चैतन्य त्याच्यावर रागवला आहे. अर्जुनने आतापर्यंत आपल्याला केवळ तो बॉस आणि आपण नोकर अशीच वागणूक दिली आहे, असा चैतन्यचा समज होतो. आता अर्जुनवर रागावलेला चैतन्य अर्जुनला चार शब्द ऐकवून नोकरी सोडणार आहे. तसेच ‘तुझा माझ्याशी असलेला संबंध आजपासून संपला’, असे बोलून तो निघून जाणार आहे. तर, सायली दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, चैतन्य आता सायलीचं बोलणं ऐकायला देखील तयार नाहीये. आता मालिकेच्या पुढच्या भागात रंजक वळण पाहायला मिळणार आहे.