Tharala Tar Mag 19 March 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. किडनॅप झालेल्या सायलीला वाचवण्यात अर्जुन यशस्वी होणार आहे. सायलीला शोधायला घराबाहेर पडलेला अर्जुन गणपती मंदिरात पोहोचून गणराया पुढे मागणं मागताना दिसणार आहे. ‘मी सायलीशिवाय जगूच शकत नाही. सायली तुझी भक्त आहे, तू तिचं रक्षण करशीलच. सायलीला वाचवण्यासाठी तूच मला मार्ग दाखव’, असं मागणं अर्जुन गणरायाकडे मागत असतानाच त्यांना देव मार्ग दाखवणार आहे. अर्जुन मंदिरातून बाहेर पडत असताना, त्याला मंदिरासमोर एक गाडी जाताना दिसणार आहे.
याच गाडीच्या मागच्या सीटवर तोंड आणि हात पाय बांधलेल्या अवस्थेत असलेल्या सायलीकडे अर्जुनचं लक्ष जाणार आहे. सायलीला पाहताच अर्जुन तडक आपली गाडी घेऊन त्या गुंडांच्या गाडीच्या मागे धावणार आहे. गुंडांच्या गाडीला रोखण्यात अर्जुन यशस्वी होणार असून, गुंडांसोबत दोन हात करून आता तो सायलीला सुखरूप सोडवणार आहे. तर, सायली घाबरलेली सायली देखील अर्जुनच्या कुशीत शिरणार आहे. यावेळी सायली देखील आपल्या मनातील भावना व्यक्त करणार आहे. दोघांच्या आयुष्यात हा एक खास क्षण असणार आहे.
दुसरीकडे, सायली सुखरूप सुटली आहे, याची कल्पना साक्षी आणि महिपतला नाही. दोघांनाही असं वाटत आहे की, आपल्या गुंडांनी सायलीला राजस्थानमध्ये नेऊन सोडलं असून, आता राजस्थानमध्ये सायलीला ओळखणारं कोणीच नसेल आणि सायली स्वतःहून राजस्थानवरून परत येऊ शकणार नाही, अशी खात्री देखील महिपतला वाटत आहे. मात्र, इथं अर्जुनने सायलीला सुखरूप सोडवले, याची कल्पना अजून कुणालाच नाही. दुसरीकडे, अर्जुन पोलिसात देखील तक्रार दाखल केली होती.
त्यामुळे अर्जुन घरातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांची सुभेदार बंगल्यात एन्ट्री झाली आहे. यावेळी पोलीस सायली आणि अर्जुन बद्दल चौकशी करणार आहेत. अर्जुन बाहेर गेला असल्याचे कळतात, आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आपण रात्रभर अर्जुन बरोबरच होतो, त्याने काहीच खाल्लं नसेल, तो टेन्शनमध्ये असेल म्हणून आपण त्याच्यासाठी कॉफी बनवायला गेलो होतो, असं खोटं प्रिया सांगणार आहे. तर, प्रियाला अर्जुनची इतकी काळजी आहे, हे बघून पूर्णा आजी आणि प्रताप यांच्या मनात तिला सून करून घेण्याचा विचार येणार आहे.
अर्जुनने सायलीला गुंडांच्या तावडीतून सोडवलं असून, आता तो सायलीला एका सुखरूप ठिकाणी घेऊन जाणार आहे. तहानेन व्याकूळ झालेल्या सायलीसाठी पाणी आणून, स्वतःच्या हाताने अर्जुन तिला ते पाणी पाजणार आहे. त्यावेळी सायलीच्या हातावरचे व्रण पाहून अर्जुनचा संताप अनावर होणार आहे. सायलीच्या हातावरच्या या जखमांची शिक्षा महिपतला भोगावेच लागेल आणि ती मी त्याला देईन, असा पण अर्जुन घेणार आहे.
संबंधित बातम्या