Tharala Tar Mag 18th January 2024 Serial Update: सायली आणि अर्जुनचं आयुष्य आता एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलं आहे. मधुभाऊंची केस सोडवण्याच्या दिशेने आता अर्जुनने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आश्रमातील विलास खुनाच्या केसमध्ये आता अर्जुनच्या हाती अतिशय महत्त्वपूर्ण पुरावे लागले आले आहेत. आता तेच पुरावे कोर्टात सादर करून अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार आहे. मात्र, आता महिपतला आरोपी म्हणून सिद्ध करण्यासाठी आता अर्जुनला एका अतिशय महत्त्वपूर्ण पुरावा साध्य करावा लागणार आहे.
कोर्टाच्या सुनावणीत अर्जुनने महिपतच्या गुन्ह्यांचा पाढा वाचून दाखवला होता. मात्र, सगळं ऐकल्यानंतर देखील महिपत आपला गुन्हा कबूल करण्यास तयार नव्हता. तर, कोर्ट केवळ पुराव्यांवर विश्वास ठेवतं कुणाच्याही बातांवर नाही, असा युक्तिवाद रविराजने केल्याने आता अर्जुनला आपला महत्त्वाचा साक्षीदार सादर करावा लागणार आहे. महिपतच्या या गुन्हांना स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या व्यक्तीला आता अर्जुन साक्षीदार म्हणून कोर्टात आणणार आहे. हा साक्षीदार दुसरा तिसरा कुणी नसून, कुसुम ताई आहे. कुसुम ताईंनी महिपतला जनता चाळीतील लोकांना त्रास देताना तर पाहिलंच आहे. मात्र, जेव्हा आश्रमात खून झाला तेव्हा देखील कुसुम ताई तिथे होत्या, हे आता समोर येणार आहे.
कुसुम ताई आता महिपत विरोधात साक्ष देणार आहेत. कुसुम ताईंच्या साक्षीमुळे आता महिपत अडचणीत अडकणार आहे. मात्र, कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोर्टाच्या नव्या सुनावणीत आरोपीच्या पिंजऱ्यात थेट महिपतला उभं केलं जाणार आहे. यावेळी अर्जुन महिपत शिखरेच्या गुन्ह्याचा पाढा वाचून दाखवणार आहे. कुसुम ताई राहत असलेली जनता चाळ हडपण्यासाठी महिपतने केलेला दंगा अर्जुनने स्वतः पाहिला होता. जनता चाळ बळकावण्यासाठी महिपतने चाळकऱ्यांचं पाणी आणि वीज कनेक्शन बंद करून टाकलं. यामुळे चाळीत राहिणारी लोकं खूप हैराण झाली होती. महिपतने गुंड पाठवून चाळीतील लोकांना धमक्या देऊन मारहाण देखील केली होती.
महिपतने जमीन बळकावण्याचा हाच पॅटर्न आश्रमात देखील वापरला होतात. त्यावेळी महिपतने साक्षी शिखरे हिची मदत घेऊन विलासचा खून घडवून आणला होता. आश्रम मधुभाऊंचे असल्याने या सगळ्याचा आरोप मधुभाऊंवर टाकला गेला. मात्र, विलासचा खून मधुभाऊंनी नाही तर महिपत आणि साक्षी यांनीच केल्याचे आता अर्जुन सिद्ध करणार आहे.