‘ठरलं तर मग’ या मालिकेत आज पुन्हा एकदा सायली आणि अर्जुन यांच्यासमोर एक नवीन संकट उभं राहताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे साक्षीने केलेल्या खोटेपणामुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. साक्षीच्या आरोपांमुळे आता अर्जुन आणि चैतन्य यांच्यावर वकिलीची सनद जाण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर बार काऊन्सिलकडून चौकशी आणि कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, केवळ रविराजच्या सांगण्यावरून बार काऊन्सिलने त्याना थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान आता प्रिया अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या कराराची फाईल शोधायला लागणार आहे. यामुळे पुन्हा एकदा सायली आणि अर्जुन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
अर्जुन आणि चैतन्य यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता रविराजही सायलीची साथ देणार आहे. रविराज घरी येऊन प्रिया आणि नागराजला घडला प्रकार सांगणार आहे. तर, प्रिया आणि नागराज मनातून आनंदून जाणार आहेत. मात्र, आता रविराज त्यांना आपण अर्जुन आणि चैतन्यची केस लढणार असल्याचं सांगणार आहे. मी अर्जुन आणि चैतन्य यांना सपोर्ट करत आहे, असं तो प्रिया आणि नागराज यांना सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर आता प्रिया आणि नागराज यांचं टेन्शन देखील वाढणार आहे. एकीकडे दोघे मिळून अर्जुनच्या अडचणी वाढवत असताना, आता रविराज त्यांच्या बाजूने झाला, तर आपल्याला सगळं काहीही सोडावे लागेल, असं त्यांना वाटत आहे.
मात्र, रविराजने काहीही करून होऊन अर्जुन आणि चैतन्यला या सगळ्यातून सुखरूप सोडवायचं, असा पण केला आहे. दुसरीकडे, सुभेदारांच्या घरात आता टेन्शनच वातावरण आहे. या टेन्शनच्या वातावरणातही घरातल्या बायका वटपौर्णिमेची तयारी करत आहेत. अर्जुन आणि चैतन्यला टेन्शनमध्ये बघून घरातील सगळीच मंडळी त्यांना नेमकं काय झालं?, असं विचारणार आहेत. यानंतर ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार आणि बार काऊन्सिलचं प्रकरण अर्जुन आणि चैतन्य सविस्तरपणे घरात सांगणार आहे. त्यामुळे सुभेदारांना देखील टेन्शन येणार आहे. मात्र, अर्जुन सुखरूप सुटावा म्हणून आता सायली त्याच्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करणार आहे.
तर, सायलीसाठी अर्जुनदेखील वटपौर्णिमेचा उपवास ठेवणार आहे. दुसरीकडे, चैतन्य या सगळ्यासाठी स्वतःला दोष देत आहे. माझ्यामुळेच या सगळ्या गोष्टी झाल्या, असं तो म्हणत असतो. तो स्वतःवर सगळं काही ओढवून घेत आहे. मात्र, सुभेदारांनी त्याला समजावून शांत केलं आहे. दुसरीकडे, प्रिया अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तिच्या हाती ही फाईल लागणार का? सायली आणि अर्जुनची पहिली वटपौर्णिमा सुखरूप पार पडणार का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.