मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार नवा खुलासा

कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार नवा खुलासा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 18, 2024 03:05 PM IST

अर्जुनच्या एका मित्राचा साक्षीशी काहीतरी संबंध असून, त्याच्या मृत्यूमागे देखील साक्षीचाच हात असणार, हे अर्जुनच्या लक्षात आलं आहे.

कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार नवा खुलासा
कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार नवा खुलासा

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक नवा खुलासा होताना पाहायला मिळणार आहे. अर्जुनसोबत या रियुनियन पार्टीत सायली देखील गेली होती. या रियुनियनमध्ये अर्जुन आणि सायली एकत्र गेले होते. मात्र, त्यांच्या सोबतच चैतन्य आणि साक्षी देखील एकत्र या कार्यक्रमाला पोहोचले होते. या कार्यक्रमात गेल्यावर चैतन्यने सगळ्यांना साक्षीची ओळख करून दिली. साक्षी ही माझी गर्लफ्रेंड असून, लवकरच आम्ही लग्न करणार असल्याचं चैतन्य सगळ्यांना सांगणार आहे. मात्र, या कार्यक्रमात अर्जुन आणि चैतन्य यांच्या एका मित्रांना साक्षीचा चेहरा ओळखला आहे. साक्षीला आपण या आधीही कुठेतरी पाहिलं आहे, कदाचित आपल्या कॉलेजमध्येच आपण हिला पाहिलंय, असं त्याला सतत जाणवत होते.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, साक्षीला नेमकं कुठे पाहिले हे त्याच्या लक्षात येत नव्हते. तर, दुसरीकडे या मुलाने आपल्याला ओळखलं हे साक्षीच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे या पार्टीत साक्षी सतत त्या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. या कार्यक्रमात सायलीने सगळ्यांची मन जिंकून घेतली. अर्जुनची बायको म्हणून सायलीने हा कार्यक्रम चांगलाच गाजवला. या कार्यक्रमात सायली आणि अर्जुन यांनी मिळून एक रोमँटिक गाणं देखील गायलं. पूर्ण कार्यक्रमात या दोघांवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. यानंतर, अर्जुन त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करत असताना, सायलीचं लक्ष त्याच्या कॉलेजमधल्या फोटोंकडे गेले.

लता-रफीचे सूर अन् शंकर-जयकिशन यांच्या सुरावटींची 'अजीब दास्तां' उलगडणार! कधी आणि कुठे? वाचा!

साक्षीसोबत दिसलेला मुलगा कोण?

या फोटो बोर्डवर अर्जुनच्या कॉलेज जीवनातील अनेक फोटो लावलेले होते. यातील एका फोटोने सायलीचे लक्ष वेधून घेतले आणि सायलीला देखील धक्का बसला. सगळ्यांच्या नजरा चुकून सायलीने हा फोटो आपल्या बॅगेत ठेवला. तर, घरी आल्यावर आल्यावर सायलीने हा फोटो अर्जुनला दाखवला. या फोटोमध्ये साक्षीला पाहून अर्जुनला चांगलाच धक्का बसला. त्यावर सायलीने त्याला विचारलं की, साक्षीसोबत दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण?

सायली-अर्जुनला मिळणार नवा पुरावा

तर, त्याचवेळी अर्जुनच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. साक्षीसोबत असलेला हा मुलगा आपला मित्र असून, आता तो या जगात नाही आणि त्याच्याच आठवणीत आपल्या डोळ्यांत पाणी आल्याचं, अर्जुन म्हणतो. आता या नव्या प्रोमोवरून हे लक्षात येत आहे की, अर्जुनच्या या मित्राचा साक्षीशी काहीतरी संबंध असून, त्याच्या मृत्यू मागे देखील साक्षीचाच हात असणार, हे अर्जुनच्या लक्षात आलं आहे. आता अर्जुन आणि सायली दोघांनाही साक्षी शिखरे विरोधात एक नवा पुरावा सापडणार आहे.

IPL_Entry_Point