Tharala Tar Mag 17th Jan: अर्जुनच्या हाती पक्के पुरावे! आश्रमाच्या केसमधून मधुभाऊ सुखरूप सुटणार का?-tharala tar mag 17th january 2024 serial update arjun collect all evidence against mahipat shikhare ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 17th Jan: अर्जुनच्या हाती पक्के पुरावे! आश्रमाच्या केसमधून मधुभाऊ सुखरूप सुटणार का?

Tharala Tar Mag 17th Jan: अर्जुनच्या हाती पक्के पुरावे! आश्रमाच्या केसमधून मधुभाऊ सुखरूप सुटणार का?

Jan 17, 2024 02:07 PM IST

Tharala Tar Mag 17th January 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात अर्जुन मधुभाऊंची केस लढताना दिसणार आहे. यासाठी तो सायलीसह कोर्टात हजर राहणार आहे.

Tharala Tar Mag 17th January 2024
Tharala Tar Mag 17th January 2024

Tharala Tar Mag 17th January 2024 Serial Update:ठरलं तर मग’ मालिका आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. अर्जुन आता मधुभाऊंना तुरुंगातून सोडवण्यासाठी सगळे पक्के पुरावे कोर्टात सादर करणार आहे. आश्रमात घडलेला विलासचा खून हा मधुभाऊंनी नाही, तर महिपत शिखरे याने केला होता, हे आता अर्जुन सिद्ध करणार आहे. ‘ठरलं तर मग’च्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना हे निर्णायक वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन आता महिपतच्या विरोधातील सगळे पुरावे एकत्र करून कोर्टात सादर करणार आहे. तर, महिपतचा पर्दाफाश करून अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात अर्जुन मधुभाऊंची केस लढताना दिसणार आहे. यासाठी तो सायलीसह कोर्टात हजर राहणार आहे. यावेळी आरोपीच्या पिंजऱ्यात थेट महिपतला उभं केलं जाणार आहे. यावेळी अर्जुन महिपतच्या पापांचा पाढा वाचून दाखवणार आहे. सायलीची कुसुम ताई राहत असलेली जनता चाळ हडपण्यासाठी देखील महिपतने प्रयत्न सुरू केले आहेत. जनता चाळ बळकावण्यासाठी महिपतने चाळकऱ्यांचं पाणी आणि वीज कनेक्शन तोडून टाकलं. यामुळे चळवासी चांगलेच हैराण झाले होते. इतकंच नाही तर, गुंड पाठवून चाळीतील लोकांना मारहाण केली आणि तिथल्या लोकांना धमक्या दिल्या.

Prathamesh Parab: कशी झाली प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या प्रेमकथेची सुरुवात? वाचा भन्नाट किस्सा...

महिपतच्या याच गुन्हांचा पाढा अर्जुनने वाचून दाखवला. मात्र, महिपतने या सगळ्यांना नकार दिला. आपण असलं काहीच केलेलं नाही, असं महिपत शिखरे म्हणणार आहे. यावेळी अर्जुन महिपतची खेळी त्याच्यावरच उलटवणार आहे. अर्जुन त्याच्यावर पलटवार करताना म्हणणार आहे की, ‘हाच पॅटर्न तुम्ही आश्रमात देखील वापरला होतात. त्यावेळी तुम्ही साक्षी शिखरे हिची मदत घेऊन विलासचा खून घडवून आणला होता. आणि या सगळ्याचा आरोप तुम्ही मधुभाऊंवर टाकला’. अर्जुनचं हे बोलणं ऐकून महिपत गोंधळला असला, तरी त्याने आपला गुन्हा मान्य केलेला नाही.

आता अर्जुन महिपतसमोर त्याच्या गुन्हाचा पुरावाच सादर करणार आहे. अर्जुन स्वतःसोबत एक पेन ड्राईव्ह घेऊन कोर्टात हजर झाला होता. याच पेन ड्राईव्हमध्ये महिपत आरोपी आणि मधुभाऊ निर्दोष असल्याचे पुरावे आहेत. आता हे पुरावे कोर्टासमोर सादर करून अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.