Tharala Tar Mag 17 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात आश्रम केस संदर्भात एक मोठी अपडेट पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन कोर्टाची परवानगी घेऊन आश्रमामध्ये तपास करण्यासाठी गेले आहेत. साक्षी आणि प्रिया विरोधातील पुरावे शोधूनच काढायचे आणि मधु भाऊंना जेलमधून निर्दोष मुक्त करायचे, असा विडाच सायली आणि अर्जुन यांनी उचलला आहे. आता सायली आणि अर्जुन यांच्या सोबतीलाच चैतन्य देखील या आश्रमात जाणार आहेत. तिघेही मिळून आश्रमाच्या चारही दिशा पिंजून काढणार आहेत. या आश्रमातून कोणता पुरावा सापडतो का, याची ते कसून तपासणी करणार आहेत. दरम्यान, अर्जुनला आश्रमातील एका खाटेखाली सोन्याच्या दागिन्याचा एक तुकडा सापडतो. मात्र, हा नेमका कसला तुकडा आहे, याचा उलगडा झालेला नाही.
त्यामुळे तो तुकडा पुराव्यांच्या डब्यात ठेवून, तिघेही आणखी काही मिळतं का याच्या शोधात जातात. इतरत्र तपासणी करू लागतात. दुसरीकडे, सुभेदारांच्या घरात पूर्णा आजी, कल्पना आई, प्रतिमा आत्या, प्रिया, अस्मिता सगळेजण छान टेबलवर बसून कॉफीचा आनंद घेत होते. त्याचवेळी त्यांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळणार आहे. मात्र, जुन्या आठवणींचा विषय निघताच प्रतिमा आत्या गोंधळून जातात. सायलीला यायला उशीर होईल का, असं म्हणत त्या सगळ्यांचा विषय बदलणार आहे. दुसरीकडे, प्रिया सायलीच्या हाती काही पुरावा तर लागणार नाही ना, या विचाराने भेदरून गेली आहे.
आश्रमात तपास करणाऱ्या अर्जुन, चैतन्य आणि सायली यांना आता एक आणखी पुरावा मिळणार आहे. सायली तपासणी करत असताना तिला आश्रमाच्या आतल्या खोलीत एका फॅशन बुटिकच व्हिजिटिंग कार्ड मिळणार आहे. आश्रमात कुणीच असं डिझाईनर आणि महागडे कपडे वापरत नाही, त्यामुळे हे कार्ड नक्की कुठल्यातरी बाहेरच्या व्यक्तीचं आहे, असा अंदाज अर्जुन आणि सायली यांनी बांधला होता. तितक्यात चैतन्य तिथे येऊन हे असले डिझायनर कपडे साक्षी वापरते, मी अनेकदा तिला अशा वेगवेगळ्या डिझायनरच्या बुटिकमध्ये सोडलं आहे, असं म्हणतो.
तर, अर्जुन ते व्हिजिटिंग कार्ड चैतन्याच्या हातात देऊन, तू या ठिकाणी गेला होतास का? असं विचारतो. यावर चैतन्य म्हणतो की, मी अशा छपन्न ठिकाणी गेलो आहे. त्यामुळे मला नेमकं असं लक्षात नाही. परंतु, या कार्डवरचा पत्ता हा पनवेल मधलाच आहे म्हणजे हे कार्ड साक्षीचं नक्कीच असू शकतं. यानंतर तिघेही मिळवून आता त्या बुटीकमध्ये जाऊन याची तपासणी करणार आहेत.
संबंधित बातम्या