Tharala Tar Mag 17 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता सुभेदार कुटुंबाला मोठा धक्का बसताना दिसणार आहे. अर्जुन प्रियाला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. या रेस्टॉरंटमध्ये प्रियां अर्जुनसाठी खास कँडल लाईट डिनर आयोजन केलं होतं. यावेळी अर्जुनने मुद्दामहून प्रियाला आपण तिच्याशी मैत्री करू इच्छित आहोत, असं भासवलं. त्यानंतर दोघांमध्ये छान गप्पा देखील रंगल्या होत्या. बोलण्याच्या ओघात अर्जुने प्रिया समोर आश्रम केसचाविषय देखील काढला होता. मात्र, तिने तो विषय टाळून लावला आहे. आता अर्जुन स्वतःहून प्रियाला सुभेदारांच्या घरात घेऊन येणार आहे. त्यामुळे घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे.
प्रियाने एक फाईल आणून पूर्णा आजी समोर अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाचं सत्य आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आयत्यावेळी ही फाईल खोटी निघाल्याने प्रिया चांगलीच तोंडघशी पडली होती. यानंतर पूर्णा आजी प्रियावर प्रचंड संतापली होती. आजपासून प्रियाने या घरात पाऊल देखील ठेवायचं नाही, असं फर्मानच पूर्णा आजीने काढलं होतं. त्यामुळे प्रियासाठी सुभेदारांच्या घराच्या दरवाजे बंद झाले होते. आता पुन्हा सुभेदारांच्या घरात कसा शिरकाव करायचा, याचा विचार प्रिया करतच होती. त्यासाठी तिने वेगवेगळे प्लॅन देखील केले. मात्र, ते सगळेच फोल ठरले.
परंतु, आता अर्जुनने स्वतःहून प्रियासमोर मैत्रीचा हात पुढे केला. यामुळे तिच्या आनंदातला आता पारावरच उरलेला नाही. अर्जुनने स्वतःच त्याच्या घराचे दरवाजे आपल्यासाठी उघडले, असं म्हणत आता प्रिया देखील त्याच्या डावात फसणार आहे. अर्जुन प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी येणार आहे. मात्र, प्रियाला दारात पाहून पूर्णा आजीचा प्रचंड संताप होणार आहे. ‘आत्ताच्या आत्ता रविराजला फोन करा आणि या मुलीला इथून घेऊन जायला सांगा’, असं पूर्णा आजी म्हणणार आहे. मात्र, त्याचवेळी अर्जुन प्रियाचा हात पकडून तिला घरात घेऊन येणार आहे.
सायली आणि अर्जुन यांच्या प्लॅननुसार आता अर्जुन घरात आल्यावर सगळ्यांशी उलट बोलणार आहे. ‘तन्वी ही या घरची लेक आहे. त्यामुळे ती घरात येणार’, असं म्हणत तो तिला हात धरून आत घेऊन येणार आहे. त्यावेळी सायली त्याला हिला का घेऊन आलात? तुम्ही फार मोठी चूक करत आहात, असं म्हणणार आहे. मात्र, यावेळी अर्जुन सायलीवर चिडणार आहे आणि तिच्यावरच ओरडत तू तन्वीवर लहानपणापासूनच जळते म्हणूनच तिच्या विरोधात असं षडयंत्र करतेस, असं अर्जुन सायलीला म्हणणार आहे. कितीही नाटक असले, तरी यामुळे अर्जुन आणि सायली दोघांनाही खूप वाईट वाटत आहे. तर, अर्जुन सायलीवर ओरडतोय हे पाहून घरातील सगळ्यांना देखील मोठा धक्का बसणार आहे. दुसरीकडे, प्रियाला मात्र मनातून आनंदी होणार आहे. मालिकेतील हे धमाकेदार कथानक येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या