Tharala Tar Mag: प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करणार! नाणं बघून आठवणी परत येणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण-tharala tar mag 17 august 2024 serial update pratima will try itself now looking at the coin will bring back memories ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करणार! नाणं बघून आठवणी परत येणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

Tharala Tar Mag: प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करणार! नाणं बघून आठवणी परत येणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

Aug 17, 2024 01:32 PM IST

Tharala Tar Mag 17 August 2024 Serial Update: जेवणाचा प्रयोग करून झाल्यानंतर आता सायली प्रतिमा आत्यांना रांगोळी काढायला सुचवणार आहे.

Tharala Tar Mag 17 August 2024 Serial Update
Tharala Tar Mag 17 August 2024 Serial Update

Tharala Tar Mag 17 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक खास वळण येताना पाहायला मिळणार आहे. प्रतिमा आत्या आता स्वतःहून आपल्या आठवणी परत कशा येतील, याचा प्रयत्न करत आहेत. हे बघून आता सायलीला खूप आनंद होणार आहे. प्रतिमा आत्याला तिचा भूतकाळ आठवावा यासाठी जर कुणी मुद्दाम प्रयत्न केले तर, त्याचा त्यांना त्रास होईल. इतकंच नाही तर, त्यांच्या प्रकृतीवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे अश्विन आधीच सगळ्यांना सांगितले आहे. मात्र, जर प्रतिमा आत्यांनी स्वतः प्रयत्न केला, तर त्यांना याचा त्रास होणार नाही. म्हणूनच आता सायली तिचे वेगळे प्रयत्न सुरू करणार आहे.

सायली आता प्रतिमा आत्यांसमोर त्यांच्या जुन्या आठवणी आणून ठेवणार आहे. मुद्दामहून त्यांच्या खोलीत प्रतिमा आत्याचा जुना मोठा फोटो, सुभेदारांची चांदीची नाणी आणि अशाच काही जुन्या आठवणी आणून ठेवल्या आहे. या गोष्टी बघून प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करतील, असे सायलीला मनोमन वाटत आहे. आता सायलीचे हेच प्रयत्न यशस्वी ठरताना दिसणार आहेत. जेवणाचा प्रयोग करून झाल्यानंतर आता सायली प्रतिमा आत्यांना रांगोळी काढायला सुचवणार आहे. तर, प्रतिमा आत्या देखील सायलीच्या या मागणीला होकार देत, सुभेदारांच्या अंगणात छान रांगोळी काढणार आहेत. 

TRP Report: तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ घसरली! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ मालिकेने मारली बाजी! पाहा यादी...

सायलीला होणार अत्यानंद!

सायली प्रतिमा आत्यांच्या रूममध्ये वाकून बघत असताना, तिला मनाला सुखावणारं दृश्य दिसणार आहे. प्रतिमा आत्या आपल्या माहेरचं नाणं हातात घेऊन, ते निरखून बघताना सायलीला दिसणार आहेत. तर, हे दृश्य पाहून आनंदी झालेली सायली धावत पूर्णा आजी आणि कल्पना आईकडे जाणार आहे. त्यांच्याकडे जाऊन सायली त्यांना ही आनंदाची बातमी देणार आहे. आता प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करत आहेत, म्हणजे त्यांची स्मृती नक्की परत येईल, असं म्हणत पूर्णा आजी आणि कल्पना देखील आनंदून जाणार आहेत. मात्र, या तिघींचा हा गोड संवाद प्रियाला बोचणार आहे.

प्रिया बिथारणार!

प्रिया आता चांगलीच कोंडीत अडकली आहे. एकीकडे प्रतिमा घरी परतून आली आहे. तर, दुसरीकडे रविराजसमोर प्रतिमाची खोटी डेड बॉडी आणि खोटा डीएनए रिपोर्ट देणाऱ्या नर्सचं सत्य आलं आहे. आता रविराज स्वतः यात लक्ष घालून सत्य शोधून काढणार आहे. तर, यामुळे आता प्रियाचे कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. प्रियानेच हे सगळं घडवून आणलं होतं. त्यामुळे आता ती अधिकच बिथरली आहे.