Tharala Tar Mag 16th October 2023 serial update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'मध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात एक धक्कादायक वळण येणार आहे. आता सायली आणि अर्जुन यांच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. सायली आणि अर्जुन हे लग्न करूनही एकमेकांपासून वेगळे आणि अलिप्त राहत आहे. जगासाठी ते पतिपत्नी असले तरी त्यांच्यात पती-पत्नीचं नातं नाही. ही गोष्ट आता सगळ्यांसमोर येणार आहे. सुभेदारांच्या घरात आलेल्या एका खास व्यक्तीने हे सत्य सगळ्यांसमोर आणले आहे. यामुळे आता घरात मोठं वादळ येणार आहे.
सायली आणि अर्जुन यांनी अतिशय कठीण परिस्थिती एकमेकांशी लग्न करावे लागले होते. सायली ही अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालेली एक मुलगी आहे. मात्र, तिने आपल्या आश्रमाला अगदी स्वतःचं घर बनवलं आहे. याच आश्रमातच ती लहानाची मोठी झाली होती. याच आश्रमाच्या जमिनीवर काही लोकांचा वाईट डोळा होता. यामुळे जमीन बळकावण्याचा इराद्याने या आश्रमात धक्कादायक घटना घडवण्यात आली होती. यात आश्रमातील विलास नावाच्या व्यक्तीचा खून झाला. तर, या खूनाचा आरोप मात्र मधुभाऊंवर म्हणजे आश्रम सांभाळणाऱ्या वडिलांसमान व्यक्तीवर आला. मात्र, मधुभाऊ आरोपी नाहीत याची सायलीला खात्री होती.
मधुभाऊंना वाचवण्यासाठी सायलीने अर्जुनकडे धाव घेतली होती. अर्जुन हा नामांकित वकील असून, त्याच्याकडे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतोच, अशी त्याची ख्याती होती. यामुळे सायली त्याच्याकडे गेली होती. मात्र, त्याची फी परवडत नसल्याचे तिने सांगितल्यावर अर्जुनने सायली समोर एक अट ठेवली होती. तिने आपल्याशी लग्न करावे, असे त्याने म्हटले. तर, मधुभाऊंना वाचवण्यासाठी सायलीने देखील होकार दिला होता. त्यांनी एकमेकांशी करार करून लग्न केले. मात्र, दोघांनीही एकमेकांपासून दुरी साधली होती.
घरातल्या लोकांसमोर मात्र ते पती-पत्नी असल्याप्रमाणेच वावरत होते. आता त्यांची पोलखोल होणार आहे. देवीचा जागर करत आलेली एक खास व्यक्ती आता अर्जुन आणि सायलीच सत्य घरात उघड करणार आहे. त्यामुळे आता मालिकेत रंजक वळण येणार आहे.