Tharala Tar Mag: प्रिया सायलीविषयी गैरसमज निर्माण करणार; अर्जुनला मोठा पुरावा सापडणार! मालिका रंजक वळणावर-tharala tar mag 16 september 2024 serial update priya will create misunderstanding about sayali ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रिया सायलीविषयी गैरसमज निर्माण करणार; अर्जुनला मोठा पुरावा सापडणार! मालिका रंजक वळणावर

Tharala Tar Mag: प्रिया सायलीविषयी गैरसमज निर्माण करणार; अर्जुनला मोठा पुरावा सापडणार! मालिका रंजक वळणावर

Sep 16, 2024 01:33 PM IST

Tharala Tar Mag 16 September 2024 Serial Update:प्रिया तिच्या सूडबुद्धीचा वापर करून सायलीवर मोठा आरोप करणार आहे. प्रिया प्रतिमा आत्याकडे जाऊन ‘सायली तुला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतेय’, असं सांगणार आहे.

Tharala Tar Mag 16 September 2024
Tharala Tar Mag 16 September 2024

Tharala Tar Mag 16 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. इतके दिवस सायली अतिशय आपुलकीने प्रतिमा आत्यांची काळजी घेत आहे. प्रियाने नेहमीच प्रतिमा आत्यांबरोबर दुजाभाव केला. सायली आणि प्रतिमा या दोघांना एकमेकींपासून वेगळं कसं करता येईल, याचा प्रयत्न प्रिया सतत करत असते. मात्र, प्रतिमा आत्या नेहमीच प्रियापासून दूर राहते. प्रियाचं वागणं हे सगळ्यांनाच खटकतं. मात्र, आता प्रिया तिचा डाव पलटताना दिसणार आहे. प्रियाचं वागणं पाहून नागराज काका आता तिला चांगलंच सुनावणार आहेत. ‘असंच करत राहिलीस, तर कुणाचा तुझ्यावर विश्वास बसणार नाही आणि या घरातून तू लवकर बाहेर होशील’, असं नागराज प्रियाला सांगतो. 

यानंतर आता प्रिया तिच्या सूडबुद्धीचा वापर करून सायलीवर मोठा आरोप करणार आहे. प्रिया प्रतिमा आत्याकडे जाऊन ‘सायली तुला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतेय’, असं सांगणार आहे. प्रतिमा आत्याच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि त्यांच्या जुन्या आठवणी परत येण्यासाठी आपण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊया, असं सायलीने सुचवलं होतं. हेच ऐकून आता प्रिया सायलीविषयी प्रतिमा आत्याच्या मनात विष कालवणार आहे. ‘सायली तुला वेडी ठरवायला बघत आहे. तू वेडी आहेस असं सांगून, तिने मानसोपचार तज्ज्ञांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. जर मानसोपचार तज्ज्ञ घरी आले, तर ते तुला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील आणि तुला त्रास देतील’,  असं प्रिया प्रतिमा आत्यांना सांगणार आहे.

TRP Report: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका टॉप ५ मधून बाहेर! या आठवड्यात कोणत्या मालिकांना मिळाला सर्वाधिक टीआरपी?

प्रिया प्रतिमा आत्यांना घाबरवणार!

आता हे ऐकून प्रतिमा आत्या भरपूर घाबरून जाणार आहेत. प्रतिमा आत्यांचा भूतकाळ हा अतिशय विदारक होता.  हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्रतिमा आत्यांना अनेक वेळा जीवघेणा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आधीपासूनच त्यांच्या मनात हॉस्पिटल विषयी प्रचंड भीती आहे. प्रियाच्या बोलण्यानंतर आता त्यांच्या मनात आणखी भीती निर्माण होणार आहे. मात्र, प्रियाचं हे बोलणं ऐकून आता प्रतिमा आत्या सायलीपासून दूर होणार का, हे अद्याप समोर आलेले नाही. 

अर्जुनला सायलीची जन्मखूण दिसणार!

दुसरीकडे, अर्जुन प्रियाच्या पायावरची जन्मखूण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. रविराज आणि प्रतिमा यांच्या मुलीच्या उजव्या पायावर एक डाग आहे, हीच तिची जन्मखूण असल्याचे सुमन काकीने अर्जुनला सांगितलं होतं.  त्यामुळे आता प्रियाच्या पायावरची हीच जन्मखूण शोधण्याचा प्रयत्न अर्जुन करताना दिसणार आहे. मात्र, आता ही जन्म खूण अर्जुनला सायलीच्या पायावर दिसणार आहे. सायलीच्या पायावर हा डाग कसा काय आला असा प्रश्न अर्जुनला पडला आहे. तर, सायलीच प्रतिमा आत्याची खरी मुलगी म्हणजे तन्वी तर नाही ना हे शोधण्याचा प्रयत्न आता अर्जुन करणार आहे.

Whats_app_banner