Tharala Tar Mag : प्रियाचा डाव फसला, अर्जुन-सायलीला मोठा पुरावा सापडला! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag : प्रियाचा डाव फसला, अर्जुन-सायलीला मोठा पुरावा सापडला! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag : प्रियाचा डाव फसला, अर्जुन-सायलीला मोठा पुरावा सापडला! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Published Oct 16, 2024 02:02 PM IST

Tharala Tar Mag 16 October 2024 Serial Update : सायली आणि अर्जुन आश्रमात जाण्याची तयार करणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रिया प्रतिमा आत्याला घेऊन सुभेदारांच्या घरी पोहोचणार आहे.

Tharala Tar Mag 16 October 2024 Serial Update
Tharala Tar Mag 16 October 2024 Serial Update

Tharala Tar Mag 16 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अतिशय सकारात्मक वळण पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन आता ‘वात्सल्य आश्रमा’त पोहोचणार आहे. कोर्टाने अर्जुन आणि सायलीला आश्रमात जाऊन तपास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे दोघेही खूप खूश झाले आहेत. आपण तिथे गेलो तर, या केसमधला महत्त्वाचा पुरावा शोधून काढूच, असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्यामुळे आता दोघे आश्रमात जाण्याची तयार करणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रिया प्रतिमा आत्याला घेऊन सुभेदारांच्या घरी पोहोचणार आहे. प्रिया इथे का आली, असा प्रश्न अर्जुनला पडणार आहे.

अर्जुनच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह बघून प्रिया मुद्दामहून सायलीकडे बघून तिला म्हणते की, ‘आईला सायलीची खूप आठवण येत होती. सारखं सायली सायली करत होती. म्हणून मी तिला इकडे घेऊन आले. आता आई आणि सायली दिवसभर गप्पा मारत बसतील.’ यावर अर्जुन प्रियाला म्हणतो की, ‘नाही आज सायलीला अजिबात वेळ नाही. आम्हाला कामासाठी बाहेर जायचं आहे.’ तेव्हा कल्पना देखील प्रियाला म्हणते की, ‘तुला माहित आहे की आज या दोघांना तुमच्या आश्रमाच्या केस संदर्भात तिकडे जायचं आहे.’ त्यावर प्रिया तिथे काहीच मिळणार नाही, असं म्हणते. यावरून अर्जुनला संशय येतो. तर, सायली मात्र या दुविधेत पडते की, आता आश्रमात जायचं की, प्रतिमा आत्याला वेळ द्यायचा.

Tharala Tar Mag : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया खेळणार नवी चाल! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

प्रतिमा आत्याने सोडवला सायलीचा प्रश्न 

सायलीला चिंतेत पाहून प्रतिमा आत्याच तिचा हा प्रश्न सोडवतात. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात की, ‘तू खूप महत्त्वाच्या कामासाठी जाणार आहेस ना.. तू अजिबात काळजी करू नकोस. मी पुन्हा येईन तुला भेटायला. तेव्हा आपण खूप गप्पा मारू. तू आता तुझ्या कामासाठी जा आणि यशस्वी हो.’ प्रतिमा आत्याचं हे बोलणं ऐकून सायलीला हायसं वाटलं. पण, यामुळे प्रियाचा खेळ फसला आणि ती आणखी चिडली. तर, सायली आणि अर्जुन आश्रमात निघून गेले.

आश्रमात सापडणार पुरावा!

आश्रमात पहिलं पाऊल ठेवताच सायलीच्या मनात सगळ्या आठवणी दाटून येतात. या आश्रमात घालवलेले प्रत्येक क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येतात. मात्र, तिथल्या कुठल्याही गोष्टीला हात लावण्यापासून अर्जुन तिला थांबवतो. हातात ग्लोव्हज घातल्याशिवाय कशाला हात लावू नका, अशी सूचना अर्जुन देतो. यानंतर सगळे शोध कामाला सुरुवात करतात. आता सायलीला तिथे एक कार्ड सापडणार आहे. हे कार्ड त्या डिझायनरचं आहे, जिचे कपडे साक्षी वापरते. म्हणजे त्या रात्री साक्षी इतके होती, याचा मोठा पुरा त्यांना सापडणार आहे.

Whats_app_banner