अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

May 16, 2024 01:28 PM IST

आता मधुभाऊंच्या केसमध्ये एक ठोस पुरावा मिळणार आहे. मात्र, तोपर्यंत अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाचे भविष्य काय असणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!
अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन त्याचा डबा घरीच विसरून जाताना दिसणार आहे. अर्थात अर्जुनने ही गोष्ट मुद्दाम केलेली आहे. आपण घरी डबा विसरून गेलो म्हणजे मिसेस सायली आपला डबा घेऊन ऑफिसमध्ये येणार आणि त्यावेळेस त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल, अशी अर्जुनची कल्पना होती. म्हणूनच अर्जुन आपला डबा घरीच विसरून गेला होता. ऑफिसमध्ये गेल्यापासून अर्जुन सायलीचाच विचार करत होता. इकडे सायलीने अर्जुनचा डबा घरीच राहिल्याचं पाहिलं. त्यावेळी कल्पना तिला म्हणाली की, जा तू ऑफिसमध्ये जाऊन अर्जुनला हा डबा देऊन ये. मात्र, ‘मी गेले तर अर्जुन सरांना याची सवय लागेल, मी नसल्यावर ही कामे कोण करेल’, असा विचार मनात येऊन सायली कल्पनाला म्हणते की, ‘आई आज माझ्याऐवजी डबा तुम्ही घेऊन जा. तुम्हाला बघून अर्जुन सर सरप्राईज होतील. त्यांनाही आवडेल.’

मात्र, कल्पना तिला प्रेमाने दटावून म्हणते की, ‘तुझा नवरा आहे ना, मग तूच घेऊन जा’ असं म्हणत कल्पना सायलीला जबरदस्तीने ऑफिसला पाठवते. सायली अर्जुनचा डब्बा घेऊन ऑफिसला जायला निघते. मात्र, आज हा डब्बा घेऊन गेले, तर त्यांना माझी सवयच लागेल आणि जर नाही घेऊन गेले तर त्यांना चांगलाच धडा मिळेल आणि पुन्हा ते कधीच डबा घरी विसरून जाणार नाहीत’, असा विचार सायलीच्या मनात येतो. या विचारामुळे सायली पुन्हा माघारी फिरणारी इतक्यात तिच्या मनाला रुखरुख लागते की, मी जर डबा दिला नाही तर, अर्जुन सर उपाशीच राहतील किंवा बाहेरचं खातील आणि त्यांना त्रास होईल, असं तिला वाटू लागतं.

दिवंगत आईच्या आठवणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान झाली भावूक! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली...

सायली डबा घेऊन ऑफिसला पोहोचणार!

अखेर मनातील सगळे विचार बाजूला सारून सायली डबा घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचते. बराच वेळ झाला सायली घरातून निघाली, तरी ऑफिसमध्ये पोहोचली कशी नाही, याचं टेन्शन अर्जुनला येतं. सायली घर सोडून तर गेली नाही ना?, असा विचार देखील त्याच्या मनाला शिवून जातो. इतक्यात सायली त्याचा डबा घेऊन ऑफिसमध्ये पोहोचते. सायली देखील जेवलेली नसते, त्यामुळे आता अर्जुन आणि सायली दोघेही जेवायला बसतात. यावेळी अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सायली समोर ठेवतो आणि आता दोनच दिवस उरले आहेत, असं म्हणतो. तितक्यात अर्जुनला ठसका लागतो. तर, सायली त्याला पाणी देऊन, शांत व्हायला सांगते. आज मी पाणी दिले, पण उद्या हे कोण करेल?, असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर देखील दुःखी भाव उमटतात.

सायली आणि अर्जुन यांच्यातील प्रेम व्यक्त होईल का?

दुसरीकडे चैतन्य घाईघाईने अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचला आहे. तुरुंगात असलेल्या महिपतकडे मोबाईल फोन असून, तो मधुभाऊंच्या केसबद्दल काहीतरी गडबड करत आहे, अशी माहिती चैतन्य अर्जुनला देतो. त्यामुळे आता त्यांना मधुभाऊंच्या केसमध्ये एक ठोस पुरावा मिळणार आहे. मात्र, तोपर्यंत अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाचे भविष्य काय असणार? ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार का? मधुभाऊंच्या केसमुळे सायली आणि अर्जुन यांच्यातील प्रेम व्यक्त होईल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner