Tharala Tar Mag: अर्जुन उकरून काढणार आश्रम केसचा विषय; सायलीच्या फोनमुळे प्रियाचा संशय बळावणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: अर्जुन उकरून काढणार आश्रम केसचा विषय; सायलीच्या फोनमुळे प्रियाचा संशय बळावणार?

Tharala Tar Mag: अर्जुन उकरून काढणार आश्रम केसचा विषय; सायलीच्या फोनमुळे प्रियाचा संशय बळावणार?

Jul 16, 2024 01:54 PM IST

Tharala Tar Mag 16 July 2024 Serial Update:अर्जुन मुद्दामून आश्रम केसचा विषय का काढतोय, तोआपल्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की, काय? असा संशय देखील प्रियाच्या मनात येणार आहे.

Tharala Tar Mag 16 July 2024 Serial Update
Tharala Tar Mag 16 July 2024 Serial Update

Tharala Tar Mag 16 July 2024 Serial Update:ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात प्रिया आणि अर्जुन डेटला गेलेले पाहायला मिळणार आहे.अर्जुन प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तो प्रियाला आधी ऑफिसमध्ये भेटतो. मात्र, त्यावेळी कामात असल्या कारणाने कोणी ना कोणी सतत त्याच्या केबिनमध्ये येत राहत. तर, यालाच वैतागून प्रिया तिथून निघून जाते. दुसरीकडे, अर्जुन सायलीची मनधरणी करत असताना पुन्हा एकदा तिला प्रियाचा फोन येतो.

या फोनवर प्रिया अर्जुनला सांगते की, ‘आपण दोघं शांततेत आणि एकांतात भेटायला हवं. तुझ्या ऑफिसमध्ये सतत कोणी ना कोणीतरी येत राहतं. त्यामुळे आपल्याला नीट निवांत बोलता देखील येत नाही.’ त्यामुळे प्रिया अर्जुनला एका ठिकाणी बोलावून घेते. तर, प्रियाला आपला प्लॅन कळायला नको, म्हणून अर्जुन देखील तातडीने तिने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचतो. प्रियाने या ठिकाणी अर्जुनसाठी कॅन्डल लाईट डिनर डेट प्लॅन केलेलं असतं. अर्जुनला हे पाहून धक्का बसतो. यावेळी बोलताना तो प्रियाला विचारतो की, ‘प्रिया हे सगळं माझ्यासाठी केलं आहेस का? किती छान आहे.’

Dharmaveer 2: सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज; ‘धर्मवीर २’ चित्रपटाचं पहिलंवहिलं गाणं ‘चला करू तयारी’ प्रेक्षकांच्या भेटीला

अर्जुन प्रियाकडून माहिती काढून घेणार?

यावर प्रिया त्याला उत्तर देते की, ‘हो हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे मी... ही आपली पहिलीच डेट आहे. तर ती खासच असली पाहिजे ना..’, असं म्हणून दोघेही जेवायला बसतात. त्यावेळी अर्जुन मुद्दामहून प्रिया सोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. यावेळी प्रियाशी बोलताना अर्जुन म्हणतो की, ‘आपल्यात आधीच मैत्री व्हायला हवी होती. आपण एकमेकांचे छान मित्र झालो असतो. पण ही आश्रम खुनाची केस मध्ये आली. त्यामुळे सगळेच गोंधळून गेलं.या आश्रम खुनाचा निर्णय कधी एकदा लागणार, काय माहित...’

प्रियाला संशय येणार?

अर्जुन मुद्दामून आश्रम केसचा विषय का काढतोय, तोआपल्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की, काय? असा संशय देखील प्रियाच्या मनात येणार आहे. त्याचवेळी अर्जुनचा फोन सतत वाजत असल्याने प्रिया थोडीशी चिडणार आहे. सायली अर्जुनला सतत फोन करत असते. अर्जुन फोन उचलत नाही, हे बघून सायली देखील चिडते. तर, अर्जुन सतत फोन कट करतो, हे बघून प्रिया त्याला म्हणते की, काही महत्त्वाचा फोन आहे का? असेल तर, उचल... मात्र, आता अर्जुन चांगलाच कोंडीत सापडला आहे. एकीकडे त्याला सायलीचा फोन उचलता येत नाहीये. तर, दुसरीकडे त्याला प्रियाला काही सांगता देखील येत नाहीये.

Whats_app_banner