Tharala Tar Mag 16 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली पुन्हा एकदा प्रतिमा आत्याच्या आठवणी परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी आता ती आणखी एक वेगळा मार्ग वापरणार आहे. यासाठी ती आता सुभेदारांच्या देवघरातील चांदीची नाणी वापरणार आहे. सुभेदारांच्या घरात प्रतिमा आत्या या लाडकी लेक असल्याने त्यांना नेहमीच प्रेमाची आणि मानाची वागणूक मिळाली होती. मात्र, प्रतिमाच्या जाण्याने या घरात एक मोठी भावनिक पोकळी निर्माण झाली होती. मात्र, आता प्रतिमा आत्या घरात परत आल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे. आता सायली याच घरच्या प्रेमाची कास धरून प्रतिमा आत्यांना त्यांच्या जुन्या आठवणी परत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
एकीकडे सायलीने प्रतिमा आत्यांना एका बंद रूममधून किचनपर्यंत घेऊन आली आहे. इतकंच काय तर, प्रतिमा आत्यांनी स्वतः आपल्या हातांनी बेसनाचे लाडू आणि चिंचगुळाची आमटी देखील बनवली. त्यांच्या हाताची तीच चव चाखून घरातील सगळेच तृप्त झाले आहेत. सगळ्यांनीच हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या तोंडून प्रतिमा आत्यांचं तोंडभरून कौतुक केलं. हे बघून देखील त्या आता मनातून सुखावल्या आहेत. यामुळेच आता सायली प्रतिमा आत्यांना या प्रेमाची जाणीव करून देताना दिसणार आहे.
सायली प्रतिमा आत्यांना घेऊन देवघरात जाणार आहे. या देवघरात दोन चांदीची नाणी ठेवलेली आहेत. यातील एक चांदीचं नाणं उचलून सायली प्रतिमा आत्यांच्या हातावर ठेवणार आहे. हे नाणं देऊन सायली प्रतिमा आत्यांना ते तुमचं असल्याचं सांगणार आहे. सुभेदारांनी त्यांच्या मुलीला म्हणजेच तुम्हाला दिलेलं हे नाणं आहे. हे बघून तरी तुम्हाला काही आठवतंय का सांगा. असंच एक आणखी नाणं आहे. या नाण्यांमध्ये सुभेदार कुटुंबाचं तुमच्यासाठी असलेलं प्रेम आहे. तुम्ही काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा, असं सायली प्रतिमा आत्यांना सांगणार आहे. यातून आता प्रतिमा आत्या देखील जुन्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सायली प्रतिमा आत्यांचा सांभाळ करत असताना आता प्रिया अर्जुनला फशी पाडण्याचं काम करणार आहे. सायली रूममध्ये नसल्याचा फायद घेऊन प्रिया पुन्हा एकदा अर्जुनच्या रूममध्ये शिरणार आहे. मात्र, अर्जुनला शिंकताना पाहून, आपल्यालाही सर्दी होईल या भीतीने प्रिया तिथून पळ काढणार आहे. तर, प्रियाला आपल्या खोलीतून बाहेर पडताना सायलीने पाहिलं आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा अर्जुनची उलट तपासणी करणार आहे.