Tharala Tar Mag 15th January 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील गोडवा पाहायला मिळणार आहे. गेले काही दिवस दोघांमध्ये सतत वाद आणि अबोला सुरू होता. मात्र, आता मकर संक्रांतीच्या आधीच त्यांच्यातील वाद मिटणार आहेत. मात्र, हा अबोला मिटण्याआधी सायलीवर एक मोठं संकट येणार आहे. सायलीच्या चाळीत मोठा राडा होणार असून, गुंड देखील येऊन थडकणार आहेत. यावेळी अर्जुन येऊन सायलीचा जीव वाचवणार आहे.
अर्जुनवर रागावलेली सायली गेल्या काही दिवसांपासून सासर सोडून माहेरी अर्थात कुसुम ताईंच्या घरी येऊन राहत होती. तर, अर्जुन देखील तिची समजूत काढण्यासाठी कुसुम ताईंच्या घराबाहेरच ठाण मांडून होता. सायलीने आपल्याला माफ करावं म्हणून अर्जुनने अनेक प्रयत्न केले होते. आता हळूहळू सायलीचा राग विरघळून देखील गेला होता. मात्र, तिने धरलेला अबोला अजूनही सुटत नव्हता. सायलीच्या न बोलण्यामुळे अर्जुन अस्वस्थ झाला होता. मात्र, सायलीचा हा अबोला काही केल्या जात नव्हता. आता सायलीसोबत एक अशी घटना घडणार आहे, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसणार आहे. तर, अर्जुन ऐनवेळी येऊन सायलीचा जीव वाचवणार आहे.
सायलीचं माहेर अर्थात कुसुम ताई राहत असलेल्या चाळीत आता काही कारणांवरून मोठे वाद होणार असून, गुंडांचा हल्ला देखील होणार आहे. बाहेर नेमका कसला वाद सुरू आहे, हे बघण्यासाठी गेलेल्या सायलीवर देखील हल्ला होणार आहे. मात्र, त्याचवेळी यात अर्जुन उडी घेणार असून, गुंडांची धुलाई करून अर्जुन सायलीचा जीव वाचवणार आहे. सायलीवर हात उचललेला पाहून अर्जुन चांगलाच चिडला होता. अर्जुनने देखील त्या गुंडांशी दोन हात केले. अर्जुन गुंडांना मारत असताना वाद वाढू नये, म्हणून सायली अर्जुनला थांबवणार आहे. निमित्त काहीही असो, पण सायली आपल्याशी बोलतेय, हे बघून अर्जुनला आनंद होणार आहे.
रागाच्या आवेशात गुंडांना मारणारा अर्जुन आता सायलीचा आवाज ऐकून शांत होणार आहे. मिसेस सायली तुम्ही माझ्याशी बोललात, म्हणजे तुमचा अबोला संपला, असे बोलून अर्जुन आनंदी होणार आहे. यानंतर आता अर्जुन आनंदाच्या भरात सायलीलाच उचलून घेणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे कथानक पाहायला मिळणार आहे.