Tharala Tar Mag : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया खेळणार नवी चाल! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया खेळणार नवी चाल! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया खेळणार नवी चाल! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Published Oct 15, 2024 01:21 PM IST

Tharala Tar Mag 15 October 2024 Serial Update : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया आता प्रतिमा आत्यांना घेऊन सुभेदारांच्या घरी जाणार आहे. यामुळे सायली अडकून पडणार आहे.

Tharala Tar Mag 15 October 2024
Tharala Tar Mag 15 October 2024

Tharala Tar Mag 15 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनला थोडासा दिलासा मिळताना दिसणार आहे. मधुभाऊंच्या आश्रम केसवर सुनावणी करणारे वकील महिपतला विकले गेलेयत, हे लक्षात आल्यावर आता अर्जुनने नवी शक्कल लढवली. त्याने आश्रमाची तापसणी करण्यासाठी एक दिवस मागून घेतला आहे. तर, कायद्यानुसार त्याला हा दिवस देण्यात आला आहे. आता यामुळे आश्रम आणखी एक दिवसासाठी वाचलं आहे. हा एक दिवस मिळाल्यामुळे अर्जुनला काहीसा दिलासा मिळाला आहे. आता अर्जुन सायलीला सोबत घेऊन जाऊन आश्रमात पुरावे शोधणार आहे.

कोर्टात सुनावणी दरम्यान अर्जुनने ही शक्कल लढवल्यामुळे आता जजला देखील दुसरा कोणता पर्याय शिल्लक नव्हता. त्यामुळे अर्जुनला परवानगी द्यायला लागली. या निर्णयामुळे महिपतची चिडचिड सुरू झाली आहे. आणखी एक दिवस फुकट गेला तरी हरकत नाही, पण आश्रमावर हातोडा चालणार आणि तिथे माझं रिसॉर्ट उभं राहणार, असा धमकीवजा इशारा महिपत अर्जुनला देऊन जाणार आहे. तर, मधुभाऊ आता खचून जाणार आहेत. पोलीस त्यांना पुन्हा तुरुंगात नेत असताना ते थांबून सायलीला विनंती करणार आहेत. ‘सायली तू आश्रमात जातेयस ना... तर तिथला एक फोटो काढून मला दे. तू ज्या कोपऱ्यात बसून गाणी गायचीस त्या कोपऱ्याचा फोटो, कुसुम जिथे वाळवण घालायची तिथला फोटो, माझ्या घरच्या थंड फरशीचा फोटो, मला सगळे फोटो हवे आहे. पुन्हा ते कधी दिसतील काय माहीत’, असं मधुभाऊ म्हणतात.

Tharala Tar Mag : महिपतने जजलाही दिली लाच; आता वात्सल्य आश्रमावर हातोडा चालणार? मालिका रंजक वळणावर

मधुभाऊ खचले!

तर, मधुभाऊंचं हे बोलणं ऐकून सायलीला खूप दुःख झालं आहे. पण, तरीही ती सगळ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘मधुभाऊ तुम्ही असं बोलू नका, आपल्या घराला काहीही होणार नाही’, असं म्हणत सायली त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते. मात्र, यामुळे काही फारसा फरक पडत नाही.

प्रिया खेळणार नवी चाल

दुसरीकडे, घरी पोहोचल्यावर साक्षी शिखरे पहिला प्रियाला फोन लावते आणि तिला आश्रम प्रकरणाबद्दल सांगते. तू आश्रमातील सगळे पुरावे नक्की नष्ट केलेस ना?, असा प्रश्न साक्षी प्रियाला विचारते. यावर प्रिया तिला म्हणते की, ‘हो मी सगळं नष्ट केलंय. इतकंच काय सायलीचं गाठोड देखील माझ्याकडे घेऊन आलेय.’ प्रिया हे बोलत असतानाचा प्रतिमा आत्या हे ऐकते. प्रतिमाला वाटतं की, हा सायलीचा फोन आहे. पण प्रिया तिला मैत्रिणीचा फोन असल्याचे सांगते. आता अर्जुनसोबत सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रियाला एक आयडिया सुचते. आत प्रिया मुद्दाम प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी जाणार आहे. त्यामुळे आता सायली अडकून पडणार आहे.

Whats_app_banner