मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साक्षीच्या खेळीने फिरवला डाव; चैतन्य-अर्जुनवर नवं संकट कोसळणार! ‘ठरलं तर मग’मध्ये शॉकिंग ट्वीस्ट

साक्षीच्या खेळीने फिरवला डाव; चैतन्य-अर्जुनवर नवं संकट कोसळणार! ‘ठरलं तर मग’मध्ये शॉकिंग ट्वीस्ट

Jun 15, 2024 11:21 AM IST

चैतन्य आणि अर्जुन मिळून काहीतरी प्लॅन करत असून, यामध्ये ते आपल्याला अडकवत असल्याचं आता साक्षीच्या लक्षात आलं आहे.

साक्षीच्या खेळीने फिरवला डाव; चैतन्य-अर्जुनवर नवं संकट कोसळणार!
साक्षीच्या खेळीने फिरवला डाव; चैतन्य-अर्जुनवर नवं संकट कोसळणार!

ठरलं तर मग’ या मालिकेत एक जबरदस्त ट्वीस्ट पाहायला मिळाला आहे. आता अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यात एक नवं वादळ येणार आहे. एकीकडे प्रतिमाच्या निधनामुळे संपूर्ण किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सायली या सगळ्यातून आपल्या कुटुंबाला सावरायचा प्रयत्न करत आहे. प्रतिमाची साडी नेसून सायली समोर आल्याने पूर्णाआजीचा राग देखील मावळून गेला होता. पूर्णा आजी आता सायलीला स्वीकारण्याचा प्रयत्न करत होती. एक टेन्शन दूर होतच असताना आता त्यांच्यावर आणखी एक मोठं संकट कोसळणार आहे. साक्षीने खेळलेली खेळी आता अर्जुन आणि चैतन्य यांच्या अडचणी वाढवणार आहे.

इतके दिवस चैतन्य आपल्या बाजूनेच आहे, असं समजणाऱ्या साक्षीला आता चैतन्याचा खरा डाव कळला आहे. चैतन्य आणि अर्जुन मिळून काहीतरी प्लॅन करत असून, यामध्ये ते आपल्याला अडकवत असल्याचं आता साक्षीच्या लक्षात आलं आहे. महिपतच्या सांगण्यावरून आता साक्षीनं चैतन्यवर ताशेरे उडावायला सुरुवात केली आहे. चैतन्य हा आपला माणूस नाही, हे महिपतने साक्षीला दाखवून दिले. त्यामुळे आता साक्षीने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन चैतन्य आणि अर्जुनवर वेगवेगळे आरोप केले. दोघांनीही मिळून आपली फसवणूक केल्याचं तिने यात म्हटलं आहे. तर, आपल्याला फसवून चैतन्यने साखरपुडा केल्याचा आरोप देखील तिने केला आहे.

आराम आणि रिलॅक्स असं काही नसतं! आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर, शाहरुख खानचा हा ‘मंत्र’ ऐकाच!

अर्जुन-चैतन्य अडकणार!

आता चैतन्य याचा जाब विचारायला साक्षीच्या घरी पोहोचणार आहे. मात्र, त्यावेळी साक्षी त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, साक्षीने घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्या आयुष्यात एक नवं वादळ आलं आहे. दोघेही बाहेर पडताच आता पत्रकारांनी त्यांना घेरलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देता देता आता अर्जुन आणि चैतन्य यांच्या नाकीनऊ आले आहेत. सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे देताना दोघांचीही तारांबळ उडली आहे. चैतन्यच्या वागण्याचा संशय आल्यावर साक्षीनं त्याचा पाठपुरावा करून सत्य शोधून काढून, आता यालाही आपण जेलमध्ये टाकायचं आणि आपल्या मार्गातून वेगळं करायचं असा प्लॅन केला होता. असं काहीतरी करायचं ज्यामुळे चैतन्य स्वतःच वैतागून स्वतःचा जीव घेईल आणि आपल्यावर काहीही आरोप येणार नाही, असा प्लान आखाण्याचा प्रयत्न साक्षी करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अर्जुन वाचवणार चैतन्यला!

मात्र, यावेळी अर्जुन आपल्या मित्राच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार आहे. अर्जुन आणि सायली मिळून चैतन्यची बाजू घेणार असून, साक्षीला या पत्रकार परिषदेचे चोख उत्तर देखील देणार आहे. मधुभाऊंच्या प्रकरणात ते साक्षीला दोषी ठरवणार असून, कुणालच्या केसमध्येही साक्षीचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आपण इतके सगळे आरोप करूनही चैतन्य आणि अर्जुनवर काहीच फरक पडत नाहीये, हे पाहून आता साक्षी भाडोत्री गुंडांकडून त्यांच्या ऑफिसवर हल्ला घडवणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हा थरार पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel