Tharala Tar Mag 15 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अतिशय मनोरंजक कथानक पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुन आता मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी आता अर्जुनने सगळ्यात मोठी रिस्क घेतली आहे. अर्जुन आता प्रियाच्या प्रेमात पडल्याचं नाटक करत आहे. इतकंच नाही, तर तिच्यासोबत डेटवरही जाणार आहे. या सगळ्यामुळे अर्जुनला खूपच त्रास होत आहे. दुसरीकडे, सायली देखील आपल्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत बघून दुःखी होत आहे.
अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचलेल्या प्रियाने अर्जुनला थेट मिठीच मारली. त्यावेळी सायली देखील ऑफिसमध्ये होती. मात्र, ती लपून बसल्यामुळे कोणालाच काही कळलं नाही. प्रियाने जरी सायलीला पाहिलं नसलं, तरी सायलीने प्रियाला अर्जुनला मिठी मारताना पाहिलं आहे. हे पाहिल्यानंतर आता तिच्या मनाला फारच वाईट वाटत आहे. अर्जुनला देखील नाईलाजास्तव या गोष्टी कराव्या लागत आहे. मात्र, आता सायलीच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत. अर्जुनच्या ऑफिसमधून निघालेली सायली आता घरी येऊन धायमोकलून रडणार आहे. तिला रडताना पाहून अर्जुन देखील गोंधळून जाणार आहे.
आता अर्जुन सतत सायलीची माफी मागताना दिसणार आहे. एकीकडे अर्जुन सायलीला सॉरी म्हणत असताना, आता दुसरीकडे प्रिया पुन्हा एकदा फोन करून त्याला भेटण्यासाठी बोलवणार आहे. अर्जुन खरंच आपल्या प्रेमात पडला आहे, असं वाटून प्रिया आता त्याच्यासाठी एक डिनर डेट प्लॅन करणार आहे. ‘तुझ्या ऑफिसमध्ये आपण भेटलो खरं पण, तिथे सतत कुणी ना कुणी मध्ये येत राहतं आणि आपल्याला डिस्टर्ब करतं. आपण अशा ठिकाणी भेटलं पाहिजे, जिथे फक्त तू आणि मी असू, आपल्याला कोणीही त्रास देण्यासाठी तिथे येणार नाही’, असं प्रिया अर्जुनला म्हणते.
इतकंच नाही तर, त्याला एक पत्ता पाठवून तिथं बोलावून घेते. प्रियाने अर्जुनसाठी खास डिनर डेट प्लॅन केली होती. या कॅण्डल लाईट डिनर डेटची तयारी पाहून अर्जुन देखील गोंधळात पडला होता. यावेळी तो प्रियाला विचारतो की, हे सगळं तू माझ्यासाठी केलं आहेस का? त्यावर प्रिया त्याला म्हणणार आहे की, ‘हो हे आपल्या दोघांसाठी आहे. तुझ्यासोबत मला वेळ मिळावा, म्हणूनच मी ही डिनर डेट प्लॅन केली आहे. ही आपली पहिली डेट आहे, ती खूप खास असली पाहिजे’. आता सायली यावर प्रतिक्रिया देणार हे मालिकेच्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या