Tharala Tar Mag: प्रियाचं सत्य शोधताना अर्जुनला प्रतिमा आत्यची खरी मुलगी सापडणार! मालिकेत येणार ट्वीस्ट-tharala tar mag 14 september 2024 serial update arjun tries to find truth of real tanvi with the help of suman ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रियाचं सत्य शोधताना अर्जुनला प्रतिमा आत्यची खरी मुलगी सापडणार! मालिकेत येणार ट्वीस्ट

Tharala Tar Mag: प्रियाचं सत्य शोधताना अर्जुनला प्रतिमा आत्यची खरी मुलगी सापडणार! मालिकेत येणार ट्वीस्ट

Sep 14, 2024 01:31 PM IST

Tharala Tar Mag 14 September 2024 Serial Update:प्रिया ही खरी तन्वी नाही, ती केवळ तन्वी किल्लेदार असल्याचा नाटक करतीये, हे अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

Tharala Tar Mag 14 September 2024
Tharala Tar Mag 14 September 2024

Tharala Tar Mag 14 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक धमाकेदार वळण पाहायला मिळणार आहे. गणपती बाप्पाच्या आरतीच्या वेळी प्रियाने केलेला हंगामा पाहून अर्जुन चांगलाच गोंधळून गेला होता. यानंतर अर्जुनने प्रियाच्या फोनवर महीपतचा फोन येत असल्याचे देखील पाहिले. महीपत प्रियाला का बरं फोन करत असावा, असा प्रश्न अर्जुनला पडला होता. तर, त्याने प्रियाशी बोलण्याचा देखील प्रयत्न केला. या बोलण्यावरून प्रियाला प्रतिमाबद्दल म्हणजेच स्वतःच्या आई बद्दल काहीच माया वाटत नाही, हे अर्जुनने हेरले आहे. प्रियाच्या बोलण्यावरून प्रियाच्या मनात आपल्या आई विषयी काहीही भावना नाही, त्याचा अर्थ ही खरी तन्वी असू शकत नाही, असा अंदाज अर्जुनने बांधला आहे. 

प्रिया ही खरी तन्वी नाही, ती केवळ तन्वी किल्लेदार असल्याचा नाटक करतीये, हे अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ती एवढी वर्ष स्वतःच्या आई-वडिलांपासून दूर राहिली. त्यामुळे कदाचित तिला आपल्या मनातील भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नसतील. इतक्या वर्षांनी आईला भेटल्यावर तिच्याशी कसं वागायचं, हे तिला कळत नसेल’, असं सायली अर्जुनला सांगते. अर्जुन सायलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. तो फक्त सायलीला प्रिया खोटं बोलते समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

Tharala Tar Mag: प्रिया आणि महीपतचं कनेक्शन अर्जुनसमोर येणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्वीस्ट

प्रतिमा आत्याने देखील प्रियाला नाकारलं!

मात्र, सायलीने त्याला ‘तुम्ही असं काहीतरी उगाच मनात आणू नका. प्रिया हीच प्रतिमा त्याची मुलगी आहे’, असं म्हटलं. दुसरीकडे प्रतिमा आत्या देखील प्रिया आपली मुलगी नसल्याचं सायलीला सांगत आहेत. प्रतिमा आत्या सायलीला तू माझी मुलगी असल्याचं म्हणत आहेत. प्रियाने आपणच तन्वी किल्लेदार असल्याचे कोणते पुरावे रविराज किल्लेदारांसमोर सादर केलेत, हे आता अर्जुन शोधून काढणार आहे. मात्र, अर्जुनला रविराज यांच्याकडून काहीच मिळणार नाही, याची खात्री होती. यासाठी तो आता तन्वीच्या काकीला गाठणार आहे. यावेळी तिच्याशी बोलत असताना अर्जुनला एक मोठी आणि महत्त्वाची माहिती मिळणार आहे. 

तन्वीच्या पायावर जन्म खुण!

काकी अर्जुनला म्हणते की, ‘तन्वीला ओळखणं अगदी सोपं होतं. कारण तिच्या उजव्या पायावर एक जन्म खुण आहे. त्यावरून आम्ही तन्वीला लगेच ओळखू शकलो.’ आता अर्जुन खोट्या तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या पायावर खरंच अशी कोणती जन्म खुण आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, त्याचवेळी त्याला सायलीच्या पायावर ही जन्म खुण दिसणार आहे. त्यामुळे प्रियाचा शोध घेता घेता आता अर्जुनला खऱ्या तन्वीचा शोध लागणार आहे.

Whats_app_banner