Tharala Tar Mag: प्रतिमाच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटीमुळे सगळेच पोट भरून जेवले! आता तरी ती सगळ्यांना आपलं मानेल?-tharala tar mag 14 august 2024 serial update pratima aatya will make chinchagulachi aamti for everyone ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रतिमाच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटीमुळे सगळेच पोट भरून जेवले! आता तरी ती सगळ्यांना आपलं मानेल?

Tharala Tar Mag: प्रतिमाच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटीमुळे सगळेच पोट भरून जेवले! आता तरी ती सगळ्यांना आपलं मानेल?

Aug 14, 2024 02:14 PM IST

Tharala Tar Mag 14 August 2024 Serial Update: प्रतिमा आत्या पहिल्यांदाच सुभेदारांच्या घरात मोकळेपणाने वावरताना दिसल्या आहेत. याला निमित्त ठरलं बेसनाचे लाडू.

Tharala Tar Mag 14 August 2024 Serial Update
Tharala Tar Mag 14 August 2024 Serial Update

Tharala Tar Mag 14 August 2024 Serial Update: ठरलं तर मग’ या मालिकेत आता भावनिक बंधन पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता सुभेदार कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रतिमा आत्या आता सुभेदारांच्या घरी परतली आहे. यामुळे सगळेच खूप खूश झाले आहेत. मात्र, प्रतिमा आत्या २० वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे आपल्या सगळ्या आठवणी हरवून बसल्या आहेत. इतकंच काय तर, त्यांना बोलता देखील येत नाहीये. प्रतिमा आत्यांना काहीच आठवत नसल्याने त्या सगळ्यांनाच घाबरत आहेत. मात्र, आता सायलीला यावर एक भन्नाट उपाय सापडला आहे.

प्रतिमा आत्या पहिल्यांदाच सुभेदारांच्या घरात मोकळेपणाने वावरताना दिसल्या आहेत. याला निमित्त ठरलं बेसनाचे लाडू. प्रतिमा आत्यांना बेसनाचे लाडू पाहून आपल्या भूतकाळातील काही गोष्टी आठवू लागल्या होत्या. मात्र, त्यांच्या सगळ्याच आठवणी अगदी पुसट आहेत. त्यामुळे त्या कुणालाच याबद्दल फार काही सांगू शकत नाहीत. मात्र, सायलीला लाडू बनवताना पाहून प्रतिमा आत्या देखील स्वयंपाक घरात जाऊन तिला मदत करू लागतात. प्रतिमा आत्याला पहिल्यांदाच न घाबरता वागताना पाहून सायली देखील खूप आनंदी झाली. मात्र, त्याचवेळी कल्पना आणि पूर्णा आजी तिथे आल्या. त्यांना पाहून प्रतिमा आत्या घाबरल्या आणि तिकडून निघून गेल्या.

Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा निक्कीने केला वर्षा उसगांवकर यांचा अपमान! मुलबाळ नसण्यावरून मारला टोमणा

प्रतिमा आत्या बनवणार चिंचगुळाची आमटी!

मात्र, यामुळे आता तिघींनाही एक छान कल्पना सुचली आहे. प्रतिमा आत्या केवळ स्वयंपाक घरातच मोकळेपणाने वावरू शकतात, हे कळल्यानंतर तिची मिळून एक प्लॅन करतात. प्रतिमा आत्या बनवू शकतील अशा सगळ्या पदार्थांची त्यांनी एक यादी बनवली. तर, यातला पहिला पदार्थ आहे चिंचगुळाची आमटी. आता सायली चिंचगुळाची आमटी बनवत असताना मुद्दामहून प्रतिमा आत्यांना तिथे यायला लावणार आहे. प्रतिमा आत्या आल्यावर सायली मुद्दामहून आपल्याला चिंचगुळाची आमटी बनवता येत नसल्याचं म्हणते. हे ऐकताच स्वतः प्रतिमा आत्या स्वतःच आमटी बनवते.

पूर्णा आजी आणि रविराज करणार कौतुक

आता जेवायला बसल्यावर सगळ्यांनाच चिंचगुळाच्या आमटीची चव वेगळीच लागणार आहे. तर, पूर्णा आजी आणि रविराज यांना लगेचच प्रतिमाच्या हातची चव असल्याचे कळणार आहे. सगळेच या चवीचं कौतुक करणार आहेत. इतकंच नाही तर, सगळेच पोटभरून जेवणार आहेत. त्यावेळी प्रतिमा आत्या आणि सायली दाराआड उभं राहून हे सगळं बघणार आहे. तर, सायली आता प्रतिमा आत्याला प्रेमाने समजावणार आहे. आपल्या जवळच्या माणसांचं नेहमीच आपल्यावर खूप प्रेम असतं, असं सायली प्रतिमा आत्यांना सांगणार आहे.