मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 13th Mar: सुभेदांच्या घरात सायलीविनाच पार पडणार महादेवाची पूजा! प्रिया घेणार संधीचा फायदा

Tharala Tar Mag 13th Mar: सुभेदांच्या घरात सायलीविनाच पार पडणार महादेवाची पूजा! प्रिया घेणार संधीचा फायदा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 13, 2024 04:38 PM IST

Tharala Tar Mag 13th March 2024 Serial Update: महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाणारी महादेवाची पूजा ही घरातल्या एका जोड्याने करायची, असा सुभेदारांच्या घरचा नियम आहे.

Tharala Tar Mag 13th March 2024 Serial Update
Tharala Tar Mag 13th March 2024 Serial Update

Tharala Tar Mag 13th March 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरात महाशिवरात्रीच्या महापूजेची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, सायली महादेवाच्या पूजेला लागणारी बेलपत्र आणण्यासाठी बाहेर गेली आहे. त्याचवेळी संतोषची पत्नी आणि त्याची मुलगी या दोघी देखील बाजारात काही खरेदीसाठी जाणार आहेत. यादरम्यान संतोषची मुलगी हरवणार असून, आईच्या नावाचा धावा करत चक्कर येऊन रस्त्यात पडणार आहे. रस्त्यावर अचानक कोसळलेल्या लहान मुलीच्या मदतीसाठी सायली धावून जाणार आहे.

क्षणाचाही विचार न करता सायलीने त्या मुलीला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. दुसरीकडे, सुभेदारांच्या घरात पूजेची वेळ झाली तरी सायली दिसत नसल्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाणारी महादेवाची पूजा ही घरातल्या एका जोड्याने करायची, असा सुभेदारांच्या घरचा नियम आहे. यंदाच्या वर्षी ही पूजा सायली आणि अर्जुन दोघे करणार होते. मात्र, आयत्यावेळी सायली पूजेला पोहोचू शकली नसल्याने, आता पूर्णा आजी आणि सुभेदार कुटुंबातील काही मंडळी पुन्हा एकदा तिला टोमणे देऊ लागणार आहेत.

सई ताम्हणकर फोटोग्राफारवर संतापली! म्हणाली  ‘मी याचा फोन फोडू?’

प्रिया संधी साधणार!

दुसरीकडे, महादेवाच्या पूजेसाठी लागणारे बेलाची पाने नसल्याकारणाने आता पूजेत खंड पडणार असे वाटत असतानाच, संधीचा फायदा घेऊन आता प्रिया सुभेदारांच्या घरात शिरणार आहे. सायली बेलाची पान आणायला विसरणार किंवा ती काहीतरी घोळ घालणार, हे आपल्याला माहीत होतं म्हणून आपण आधीच तयारी करून ठेवली होती, असं म्हणून प्रिया बेलाची पानं गुरुजींच्या हातात देणार आहे. वेळेवर बेलाची पाने आणून तिने पुन्हा एकदा पूर्णा आजीचे मन जिंकून घेतले आहे. तर, या सगळ्यांमध्ये सायली पुन्हा एकदा व्हिलन ठरली आहे. सायली नेमकी कुठे गेली आहे, तिला इतका उशीर का होतोय, अशी काळजी असलेला अर्जुन सायलीला फोन करतो. मात्र, त्यावेळी सायली ‘मी घरी येते’ इतकंच बोलून फोन ठेवून देते.

संतोषला पाहून सायलीला बसणार धक्का!

बराच वेळ झाला तरी सायलीचा पत्ता नाही आणि यामुळे आता महादेवाची पूजा आणखी काही वेळ थांबवण्यात अर्थ नाही, असं म्हणून सुभेदार कुटुंब महादेवाच्या पूजेची तयारी सुरू करणार आहे. अर्जुनकडून एकट्यानेच ही पूजा करवून घेतली जाणार आहे. तिकडे हॉस्पिटलमध्ये असलेली सायली ती लहानगी मुलगी शुद्धीवर आल्यावर तिच्या कुटुंबाला फोन लावून त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवून घेणार आहे. त्यावेळी संतोष आणि त्याच्या पत्नीला तिथे पाहून सायलीला देखील धक्का बसणार आहे. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून, संतोष मुलगी आहे हे तिच्या लक्षात येणार आहे.

संतोषला पश्चाताप होणार?

तर, आपल्याला न विचारताच तू मुलीला हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलीस यावरून संतोष आणि त्याची पत्नी सायलीशी वाद घालणार आहेत. इतक्यात डॉक्टर येऊन संतोष आणि त्याच्या पत्नीला ‘तुमच्या मुलीचा जीव या बाईंमुळेच वाचला’, असे सांगणार आहेत. ‘मी आणि अर्जुन सर इतक्या खालच्या थराला गेलेली माणसं नाही आहोत की, अशा एखाद्या गोष्टीचा स्वतःसाठी फायदा करून घेऊ’, असे म्हणत सायली आता संतोषला आणखी चार गोष्टी ऐकवणार आहे. दुसरीकडे, संतोषला देखील पश्चाताप होणार आहे.

IPL_Entry_Point