Tharala Tar Mag 13th Feb: चैतन्यला चुना लावून साक्षी शोधणार केसची फाईल; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ट्वीस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 13th Feb: चैतन्यला चुना लावून साक्षी शोधणार केसची फाईल; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ट्वीस्ट

Tharala Tar Mag 13th Feb: चैतन्यला चुना लावून साक्षी शोधणार केसची फाईल; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ट्वीस्ट

Feb 13, 2024 06:38 PM IST

Tharala Tar Mag 13February 2024 Serial Update: चैतन्य कामाला गेल्यावर साक्षी त्याच्या घरात मधुभाऊंच्या केसची फाईल शोधण्याचे काम करणार आहे.

Tharala Tar Mag 13February 2024
Tharala Tar Mag 13February 2024

Tharala Tar Mag 13 February 2024 Serial Update: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये अनेक ट्वीस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत. सध्या सायली आणि अर्जुन हनिमूनवरून परतले आहेत. मात्र, आता हनिमूननंतर त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. एकीकडे हनिमूनवरून परतलेला अर्जुन अजूनही हवेतच आहे. अर्जुनला आपल्या प्रेमाची जाणीव झाली आहे. इतकंच नाही तर, अर्जुनने आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. मात्र, सायलीला त्याच्या या प्रेमाची खबरच नाही. दारूच्या नशेत सायलीने अर्जुनच्या प्रेमाची कबुली ऐकलेलीच नाही. तरीही अर्जुन आता याच प्रेमाच्या हवेत तरंगत आहे.

दुसरीकडे, सायली आणि अर्जुन यांच्या मागे माथेरानमध्ये गेलेली प्रिया देखील आता घरी परतली आहे. घरी परतलेल्या प्रियाला आता वडील रविराज आणि सुमन तिला तिच्या राजस्थान ट्रीपविषयी विचारणा करत आहे. अर्थात प्रियाने घरी राजस्थानला जात असल्याचे सांगून माथेरान गाठलं होतं. आता घरी परतल्यानंतर सगळेच तिला तिच्या या सहलीबद्दल विचारू लागले होते. तर, सुमन देखील तिच्याकडे राजस्थानमधील फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यास सांगत आहे. मात्र, ते फोटो दाखवायला लागू नयेत म्हणून प्रिया वेगवेगळ्या शकला लढवत आहे. आता स=प्रिया स्वतःचा मोबाईल पाण्याने भरलेल्या जगमध्ये टाकणार आहे.

Mallika Rajput Death: कंगना रनौतसोबत झळकलेल्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; घरात आढळला मृतदेह

यानंतर स्वतःच रविराजकडे येऊन ती आपला फोन खराब झाल्याचा कांगावा करणार आहे. आपल्या फोनमधील फोटोच नाही तर, त्यातील अभ्यासाच्या गोष्टी देखील गेल्याच सांगून ती नाटक करणार आहे. यामुळे आता तिला फोटो दाखवावे लागणार नाहीयेत. दुसरीकडे, साक्षी बऱ्याच खोट्या गोष्टी सांगून आणि नाटकं करून चैतन्यच्या घरातच राहिली आहे. आता साक्षी चैतन्यला गोड गोड बोलून भूलवायला बघणार आहे. साक्षीने चैतन्यचा फोन देखील स्वीच ऑफ करून ठेवला आहे. त्यामुळे चैतन्य अर्जुन आणि सायलीला आणायला जायचे हेच विसरून गेला आहे. आता अर्जुन स्वतःच चैतन्यला भेटायला येणार आहे.

दुसरीकडे, चैतन्यला कामाला पाठवण्याचे निमित्त करून साक्षी त्याला डबा बनवून देणार आहे. तर, चैतन्य कामाला गेल्यावर ती त्याच्या घरात मधुभाऊंच्या केसची फाईल शोधण्याचे काम करणार आहे. आता साक्षीच्या हाती ही फाईल लागेल का? आणि फाईल सापडलीच तर, साक्षी पुढे कोणतं पाऊल उचलणार? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner