Tharala Tar Mag: प्रतिमाच्या स्मृती परत आणण्यासाठी सायलीला मिळाली आयडिया; आता प्रियाचं बिंग फुटणार?-tharala tar mag 13 august 2024 serial update sayali gets the idea to bring back the pratima aatya s memory ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रतिमाच्या स्मृती परत आणण्यासाठी सायलीला मिळाली आयडिया; आता प्रियाचं बिंग फुटणार?

Tharala Tar Mag: प्रतिमाच्या स्मृती परत आणण्यासाठी सायलीला मिळाली आयडिया; आता प्रियाचं बिंग फुटणार?

Aug 13, 2024 12:29 PM IST

Tharala Tar Mag 13 August 2024 Serial Update: सायली बेसनाचे लाडू आणि चिवडा बनवणार आहे, हे काळातच प्रतिमाला तिच्या भूतकाळातील काही गोष्टी धूसरपणे आठवू लागल्या होत्या.

Tharala Tar Mag 13 August 2024 Serial Update
Tharala Tar Mag 13 August 2024 Serial Update

Tharala Tar Mag 13 August 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आता अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे. प्रतिमा आत्याच्या आठवणी परत याव्यात म्हणून आता सगळेच जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. तर, यासाठी आता सायलीला एक भन्नाट आयडिया मिळाली आहे. पण, सायलीचे हे प्रयत्न बघून प्रिया मात्र मनातून हादरून गेली आहे. अधिक प्रतिमा प्रियाशी फटकून वागते. जर तिच्या आठवणी परत आल्या, तर ती आपल्याला घरातून काढूनच टाकेल, असं प्रियाला वाटत आहे. त्यामुळे ती चांगलीच घाबरली आहे.

आजच्या भागात प्रतिमा तिच्या घरात पहिल्यांदाच मोकळेपणाने वागताना दिसणार आहे. सायली बेसनाचे लाडू आणि चिवडा बनवणार आहे, हे काळातच प्रतिमाला तिच्या भूतकाळातील काही गोष्टी धूसरपणे आठवू लागल्या होत्या. तिने याच गोष्टी सायलीला सांगण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, त्या काही सायलीला कळल्या नाहीत. कल्पनाने आवाज दिल्यामुळे सायली तिच्या कामाला निघून गेली. यानंतर सायली बेसनाच्या लाडूसाठी बेसन भाजत असताना, त्याचा खमंग सुवास घरभर पसरणार आहे. त्या सुवासाने प्रतिमा देखील स्वयंपाकघराकडे ओढली जाणार आहे. आता प्रतिमा आत्या स्वतः सायलीला बेसनाचे लाडू कसे बनवायचे याच्या टिप्स देताना दिसणार आहेत. यासाठी त्या स्वतः स्वयंपाक घरात येणार आहेत.

Bigg Boss Marathi 5: छोट्या पाहुण्यांमुळे घरात मोठे वाद! लंगोट बदलण्यावरून ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात राडा

प्रतिमाच्या आठवणी परत येणार?

प्रतिमा आत्याच्या स्वयंपाक घरात काम करत असतानाच त्यांना पूर्णा आजी आणि कल्पना आई बघणार आहेत. मात्र, दोघीचं आपल्याकडे लक्ष आहे, हे बघून प्रतिमा आत्या पुन्हा घाबरून गेल्या आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. यामुळे पूर्णा आजी आणि कल्पनाला वाईट वाटलं. मात्र, सायलीने दोघींनाही एक भन्नाट आयडिया सांगितली. प्रतिमा आत्यांना घरात मोकळेपणाने वावरण्याची संधी द्यायची असले, तर स्वयंपाक घराशिवाय दुसरी चांगली जागा नाही, असं सायली म्हणते. यावर पूर्णा आजी आणि कल्पना देखील होकार देतात. आता तिघीजणी विमलला मदतीला घेऊन प्रतिमा आत्यांसाठी काही पदार्थांची यादी बनवणार आहेत. मात्र, हे बघून प्रिया घाबरून जाणार आहे. ‘माझ्या आईला काम करायला लावू नका. हवं तर मी बाबांना सांगून एक नोकर बोलावून घेते’, असं प्रिया त्यांना म्हणते. मात्र, पूर्णा आजी पुन्हा एकदा तिच्यावर चिडणार आहेत.

स्वयंपाकाच्या निमित्ताने जादू होणार?

आता सायली मुद्दामहून आपण कामात असल्याचं भासवून प्रतिमा आत्यांना स्वयंपाक घरात बोलावून घेणार आहे. त्यावेळी सायली चिंचगुळाची आमटी कशी करायची, त्यात किती गुळ टाकायचा याचा अंदाज मुद्दाम विमलला आणि पूर्णा आजींना विचारणार आहे. तर, त्यावेळी स्वयंपाक घरात आलेल्या प्रतिमा आत्या स्वतः सायलीला आमटी बनवून दाखवणार आहेत. तर, प्रतिमाच्या हातची जुनी चव चाखून पूर्णा आजी देखील खूप खूश होणार आहेत.