Tharala Tar Mag 12th October 2023 Serial Update: ‘ठरलं तर मग’मध्ये सायली आणि अर्जुनच्या प्रेमाचा ट्रॅक कधी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक आसुसले आहेत. तर, अजूनही सायली आणि अर्जुनला मात्र त्यांच्या प्रेमाची जाणीवच होत नाहीये. मात्र, आता त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी चैतन्य पुढाकार घेणार आहे. चैतन्य अर्जुनला त्याच्या भावनांची जाणीव करून देणार आहे. एरव्ही धाकड असलेला अर्जुन सायलीला हॉस्पिटलमध्ये पाहून तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. आता सायलीला सुखरूप पाहून त्याला हायसं वाटत आहे. तर, तिने आता सतत आपल्या नजरेसमोर असावं असं अर्जुनला वाटत आहे.
सायलीवर कुणीतरी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करतंय, याची माहिती मिळाल्यापासून अर्जुन टेन्शनमध्ये आला आहे. त्याला सतत सायलीची काळजी वाटत आहे. सायलीला पुन्हा कुणी मारण्याचा प्रयत्न केला तर काय करावं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. सायलीच्या आजारपणानंतर आता बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये पोहोचलेल्या अर्जुनला सायलीच्या काळजीने घोर लागला आहे. त्याचं कामातही लक्ष लागेना झालं आहे. त्याची हीच अवस्था आता चैतन्यच्या लक्षात आली आहे.
अर्जुनला काळजीत बघून आता चैतन्यला देखील अनेक प्रश्न पडले आहेत. यानंतर तो आता अर्जुनशी संवाद साधणार आहे. यावेळी अर्जुन सायलीच्या काळजीत बुडाल्याचे त्याला कळणार आहे. तर, आता तो अर्जुनला सायलीवरील प्रेमाची जाणीव करून देणार आहे. मात्र, अर्जुन त्याच्या शक्यता नाकारणार आहे. यावेळी त्याला समजावताना चैतन्य काही उदाहरणं देखील देणार आहे. या आधी कधी देवाला साधा नमस्कारही न करणारा अर्जुन सायलीला मृत्यूशी झगडताना पाहून देवाच्या मंदिरात बसून देवाचा धावा करत होता. तर, आधी नेहमी बेफिकीर असणारा अर्जुन आता सायलीच्या विचारांनी देखील कावरा बावरा झाला आहे. या प्रेमात पडल्याच्या भावना असल्याचं चैतन्य अर्जुनला सांगणार आहे.
चैतन्यचं बोलणं ऐकून आता अर्जुनला देखील या भावनांची जाणीव होणार आहे. आपण सायलीच्या प्रेमात पडलो आहोत, आणि आता तिच्याशिवाय जगणं देखील कठीण झालं आहे, हे अर्जुनला जाणवणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.