Tharala Tar Mag 12th Mar: सायली-अर्जुनला मिळणार संतोषला अडकवण्याची संधी! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 12th Mar: सायली-अर्जुनला मिळणार संतोषला अडकवण्याची संधी! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

Tharala Tar Mag 12th Mar: सायली-अर्जुनला मिळणार संतोषला अडकवण्याची संधी! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

Mar 12, 2024 04:28 PM IST

Tharala Tar Mag 12th March 2024 Serial Update: इतकं सगळं प्रेमाने आणि शांतपणे बोलूनसुद्धा संतोष खरं का सांगत नाही आहे, असा प्रश्न सायलीला पडला आहे.

Tharala Tar Mag 12th March 2024 Serial Update
Tharala Tar Mag 12th March 2024 Serial Update

Tharala Tar Mag 12th March 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आता सायली आणि अर्जुन मिळून संतोषला पकडण्याचा नवीन प्लॅन बनवत आहेत. सरळ आणि शांत मार्गाने संतोष काही सांगत नाहीये, हे कळल्यानंतर आता सायली आणि अर्जुन दुसरा मार्ग अवलंबणार आहेत. एकीकडे सुभेदार कुटुंब अर्जुन आणि सायलीच्या विरोधात उभे असताना, सायली आणि अर्जुन मात्र आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. थेट संतोषच्या घरी जाऊन ते पुन्हा एकदा त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. संतोष धडधडीत खोटे बोलतोय याची सायली आणि अर्जुनला अगदी खात्री आहे. म्हणूनच, सायली आणि अर्जुन संतोष घरी जाणार आहेत.

यावेळी सायली आबी अर्जुन घराबाहेर पडत असताना पूर्णा आजी पुन्हा एकदा दोघांना टोकणार आहे. तर, अस्मिता देखील आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्जुन सायलीचीबाजू घेईल इतक्यातच प्रताप देखील मध्ये पडून दोघांना काही गोष्टी सुनावू लागणार आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असलेल्या सायलीच्या डोक्यात एकच गोष्ट सतत फिरत आहे, ती म्हणजे संतोषच्या खोटं बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. सुभेदार कुटुंबाचे टोमणे ऐकून आता सायली त्यांना उत्तर देणार आहे.

Nitish Bharadwaj Daughters: ‘बाबा म्हणायची देखील लाज वाटतेय!’; मुलींच्या बोलण्याने टीव्हीच्या ‘श्रीकृष्णा’ला बसला धक्का!

‘पूर्णा आजी मी तुम्हाला डोळ्यासमोर नको ना, म्हणूनच मी घराबाहेर जात आहे. मला बाबांचा खरा गुन्हेगार शोधून काढायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही बाहेर चाललो आहोत. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, हे मी सिद्ध करूनच राहीन’, असं सायली म्हणणार आहे. तर, या सगळ्यांमध्ये सतत वाद वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्मिताला देखील आता सायली सुनावणार आहे. आम्ही कुटुंब तोडण्यासाठी नाही, तर आपलं तुटलेलं कुटुंब पुन्हा जोडण्यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याचे सायली म्हणणार आहे. आमच्या प्रयत्नांचा चुकीचा अर्थ काढू नका आम्ही सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी धडपड करत आहोत, असं सायली आणि अर्जुन आपल्या कुटुंबाला सांगणार आहेत.

घरातून बाहेर पडल्यावर सायली आणि अर्जुन आता थेट संतोषच्या घरी पोहोचले आहेत. आपल्या दारावर सायली आणि अर्जुन दोघांना बघून आता संतोषची भंबेरी उडाली आहे. मात्र, आम्ही तुझी माफी मागण्यासाठी आलो आहोत, असे दोघेही त्याला सांगणार आहे. तर, घाबरलेला संतोष ‘मी पोलिसांना बोलवेन’, अशी धमकी दोघांना देणार आहे. संतोष ऐकत नाही हे पाहून आता सायली भावूक होऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, संतोष सायली आणि अर्जुनला तिथून निघून जायला सांगणार आहे. इतकं सगळं प्रेमाने आणि शांतपणे बोलूनसुद्धा संतोष खरं का सांगत नाही आहे, असा प्रश्न सायलीला पडला आहे. इतक्यात संतोषची पत्नी व त्याची मुलगी घरात येणार आहेत. डॉक्टरांनी त्याच्या मुलीला ऑपरेशन शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याचे सांगितले आहे, असे त्याची पत्नी त्याला सांगणार आहे. याचाच अर्थ मुलीच्या ऑपरेशनसाठी लागणारा पैसा उभारण्यासाठी संतोष महिपतला मदत करत आहे, हे आता सायलीला कळणार आहे. मालिकेच्या आगामी भागात हा ट्रॅक बघायला मिळणार आहे.

Whats_app_banner