Tharala Tar Mag: प्रिया खरी तन्वी किल्लेदार नसल्याचं अर्जुनला कळणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर-tharala tar mag 12 september 2024 serial update arjun will know that priya is not the real tanvi killedar ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रिया खरी तन्वी किल्लेदार नसल्याचं अर्जुनला कळणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

Tharala Tar Mag: प्रिया खरी तन्वी किल्लेदार नसल्याचं अर्जुनला कळणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

Sep 12, 2024 01:12 PM IST

Tharala Tar Mag 12 September 2024 Serial Update: प्रिया खोटी तन्वी बनून या घरात वावरत आहे आणि सगळ्यांच्या भावनांशी खेळत आहे, असं अर्जुन म्हणणार आहे.

Tharala Tar Mag 12 September 2024: ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर
Tharala Tar Mag 12 September 2024: ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

Tharala Tar Mag 12 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक नवं वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुनने प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी तिच्याशी मैत्रीचं नाटक केलं आहे. मात्र, या नाटकाचा फायदा घेऊन, आता प्रिया अर्जुन आणि सायली या दोघांच्या नात्यात अनेक वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतेय, ही गोष्ट समजून देखील अर्जुन आणि सायली यांना शांत बसावं लागत आहे. मात्र, आता लवकरात लवकर प्रियाकडून सत्य काढून घेऊन या सगळ्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय अर्जुनने घेतला आहे. एकीकडे अर्जुन प्रियाशी मैत्री करतोय, तर दुसरीकडे प्रिया तिच्या वागण्यामुळे सुभेदारांच्या घरात सतत तोंडावर पडत आहे. गणपतीच्या आरतीच्या वेळी प्रियाने केलेल्या तमाशामुळे आता रविराज किल्लेदार देखील तिच्यावर चांगले संतापले आहेत.

दुसरीकडे, प्रिया प्रतिमाला देखील त्रास देण्याचा प्रयत्न सतत करत आहे. प्रतिमाला तिच्या जुन्या आठवणी परत मिळू नयेत, म्हणून प्रिया कसोशीने प्रयत्न करतेय. गणपतीच्या आरतीचे वेळी प्रियाने केलेल्या प्रकारानंतर सगळ्यांचीच बोलणी तिला खावी लागली होती. त्यामुळे आता अर्जुन प्रियाशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जाणार आहे. आपण प्रियाशी मैत्री करतोय आणि इतकं सगळं होऊनही आपण तिच्याशी बोललो नाही, तर तिला संशय येईल, असा विचार करून अर्जुन आता तिच्यासोबत गप्पा मारण्यासाठी तिच्या रूममध्ये जाणार आहे. यावेळी तो प्रियाला आपल्या शब्दांमध्ये गुंतवून, तिला धीर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Tharala Tar Mag: प्रिया आणि महीपतचं कनेक्शन अर्जुनसमोर येणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्वीस्ट

अर्जुन प्रियाशी बोलायला जाणार!

बोलण्याबोलण्याच्या ओघात प्रिया आश्रमातील काही गोष्टी सांगते का, याकडे अर्जुनचं लक्ष लागलं आहे. ‘तू लहान असताना कुणाशी बोलायचीस? कुणासोबत आपल्या मनातील सगळ्या भावना शेअर करायचीस?’, असं अर्जुन प्रियाला विचारतो. मात्र, अर्जुनचे प्रश्न ऐकताच प्रिया गडबडून जाते. त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याआधीच तिचा फोन वाजतो. यामुळे तिचं लक्ष विचलित होतं. परंतु, अर्जुन तिला तिथेच थांबवून तिचा फोन आणण्यासाठी टेबलाजवळ जातो. आता प्रियाच्या फोनवर महिपतचा फोन येत असल्याचे अर्जुनच्या लक्षात येणार आहे. हे पाहिल्यानंतर त्याला चांगलाच धक्का देखील बसणार आहे.

प्रिया खरी तन्वी नाही?

यानंतर तो आपल्या रूममध्ये येऊन सायलीशी बोलताना प्रिया खरी तन्वी किल्लेदार नसल्याचं सांगणार आहे. प्रिया खोटी तन्वी बनून या घरात वावरत आहे आणि सगळ्यांच्या भावनांशी खेळत आहे, असं अर्जुन म्हणणार आहे. मात्र, सायली समजावणीच्या सुरात अर्जुनलाच ‘असं काही नसेल, तुम्हाला उगाचच काहीतरी वाटतंय’, असं म्हणणार आहे. मात्र, अशी कुठली मुलगी आहे, जी आपली आई वीस वर्षानंतर घरी आल्यावर तिच्याशी फटकून वागेल? तुम्ही तिच्या जागी असतात तर काय केलं असतं? असा उलट प्रश्न अर्जुन सायलीला करणार आहे.

Whats_app_banner