Tharala Tar Mag: अखेर सायली अर्जुनला देणार परवानगी! प्रियाशी प्रेमाचं नाटक सत्य समोर आणू शकेल का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: अखेर सायली अर्जुनला देणार परवानगी! प्रियाशी प्रेमाचं नाटक सत्य समोर आणू शकेल का?

Tharala Tar Mag: अखेर सायली अर्जुनला देणार परवानगी! प्रियाशी प्रेमाचं नाटक सत्य समोर आणू शकेल का?

Published Jul 12, 2024 02:49 PM IST

Tharala Tar Mag 12 July 2024 Serial Update: प्रियाकडून लवकरात लवकर सत्य वदवून घेऊन मधुभाऊंची केस सोडवून आपल्या मनातील खऱ्या भावना कधी एकदा सायलीला सांगतो, असं अर्जुनला झालं आहे.

Tharala Tar Mag 12 July 2024 Serial Update
Tharala Tar Mag 12 July 2024 Serial Update

Tharala Tar Mag 12 July 2024 Serial Update: ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांचं प्रेमळ आणि लटकं राग आणि भांडण पाहायला मिळणार आहे. अर्जुन प्रियाशी प्रेमाचा नाटक करणार या विचारांना सायली चिडली आहे. मात्र, अजूनही तिने अर्जुनला याविषयी काहीही सांगितलेलं नाही. दुसरीकडे, अर्जुन देखील याच विचारात पडला आहे की, ‘मी प्रियाशी बोलणार याचा सायलींना आता का याचा त्रास होतोय? याआधी त्यांना कधीच असं वाटलं नव्हतं. मग, याचवेळी मी प्रियाशी बोलायचा प्रयत्न करण्याचा विचार करतोय, तर त्यांना का इतका वाईट वाटतंय?’ सायलीच्या मनात अर्जुनविषयी असलेलं प्रेम हे अजूनही त्याला कळलेलं नाही.

मात्र, प्रियाकडून लवकरात लवकर सत्य वदवून घेऊन मधुभाऊंची केस सोडवून आपल्या मनातील खऱ्या भावना कधी एकदा सायलीला सांगतो, असं अर्जुनला झालं आहे. आता अर्जुन सायलीला थेट या विषयी विचारताना दिसणार आहे. अर्जुन सायलीला म्हणणार आहे की, ‘मी प्रियाशी केवळ प्रेमाचं नाटक करणार आहे. कारण ती तेव्हाच मला सगळी खरी माहिती देईल. तुम्हाला असं वाटत नाही का, की सगळं सत्य लवकरात लवकर बाहेर यावं आणि मधुभाऊ सुखरूप सुटावेत? मधुभाऊंना सुखरूप सोडवायचं असेल, तर आता हा एकच पर्याय शिल्लक आहे. आपल्याला तोही करून पाहायलाच हवा.’

Kakuda Review: ‘काकुडा’ नक्की आहे तरी काय? सोनाक्षी सिन्हाच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा! वाचा कसा आहे चित्रपट...

प्रिया पुन्हा सुरू करणार नाटक!

अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर सायली देखील हे नाटक करण्यासाठी त्याला परवानगी देणार आहे. मात्र, हे नाटक सुरू असताना मी तुमच्या आजूबाजूलाच असेल हा, असं म्हणत सायलीदेखील त्याच्यासोबत ऑफिसला जाणार आहे. दुसरीकडे, प्रिया पूर्णा आजीचा विश्वास पुन्हा जिंकून घेण्यासाठी, अस्मिताला सांगून प्रतिमा आत्याची डायरी चोरते. या डायरीतील काही पानांचे फोटो काढून अस्मिता प्रियाला पाठवते. यानंतर प्रिया अगदी प्रतिमासारखं वागण्याचं नाटक करत आहे.

प्रतिमासारखं घरात धूप दाखवणं, प्रतिमासारखी साडी नेसणं, इतकंच नाही तर प्रतिमा जी रांगोळी काढायची तीच रांगोळीची डिझाईन तिनं एका रांगोळी आर्टिस्टकडून काढून घेतली आहे आणि त्याच रांगोळीमध्ये रंग भरण्याचं नाटक करत, ती रांगोळी आपणच काढल्याच सगळ्यांना सांगणार आहे. यामुळे प्रतिमाचे गुण तिच्या मुलीत उतरले, असे म्हणत सगळे तिचं कौतुक करणार आहेत. याचाच फायदा घेऊन आता ती पूर्ण आजीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

Whats_app_banner