Tharala Tar Mag 12th Feb: अर्जुनसमोर येणार साक्षी-चैतन्यच्या नात्याचं रहस्य! केसमध्ये येणार धक्कादायक वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 12th Feb: अर्जुनसमोर येणार साक्षी-चैतन्यच्या नात्याचं रहस्य! केसमध्ये येणार धक्कादायक वळण

Tharala Tar Mag 12th Feb: अर्जुनसमोर येणार साक्षी-चैतन्यच्या नात्याचं रहस्य! केसमध्ये येणार धक्कादायक वळण

Feb 12, 2024 04:00 PM IST

Tharala Tar Mag 12 February 2024 Serial Update: अर्जुन चैतन्यच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला मोठा धक्का बसणार आहे. चैतन्य आणि साक्षी एकमेकांना मोठी मारत असतानाच अर्जुन तिथे पोहोचणार आहे.

Tharala Tar Mag 12 February 2024
Tharala Tar Mag 12 February 2024

Tharala Tar Mag 12 February 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन आता त्यांच्या माथेरान हनिमून ट्रीपवरून घरी परतले आहेत. अर्जुनने नुकतीच सायलीकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सायलीला मात्र त्याची कल्पना नाही. दुसरीकडे माथेरानमधून परतलेल्या सायलीला पूर्णा आजीकडून बोलणी खावी लागत आहेत. सायलीने माथेरानमध्ये दारू पिऊन जो हंगामा केला, तो प्रियाने सगळा आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. तिने हाच व्हिडीओ आता सगळ्या सुभेदार कुटुंबाला पाठवला आहे. तर, सायलीचा हाच व्हिडीओ पूर्णा आजीने देखील पाहिला आहे. या व्हिडीओमुळे पूर्णा आजीने सायलीला चांगलंच फैलावर घेतलं आहे. आता सायलीला सुभेदार कुटुंबाची इभ्रत वेशीवर टांगली असा टोमणा ऐकावा लागणार आहे.

सायली आणि अर्जुन घरी परतून आल्यानंतर आता पूर्ण आजी चिडली आहे, हे बघून प्रिया देखील आपला मनसुबा पूर्ण करण्यासाठी सुभेदारांच्या घरात आली आहे. प्रिया सध्या खोटी तन्वी बनून किल्लेदारांच्या घरात राहत आहे. तन्वी ही रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे. पूर्णा आजीला तन्वीलाच आपल्या घरची सून करून घ्यायचे होते. मात्र, अर्जुनने सायलीशी लग्न केल्याने पूर्णा आजी सायलीचा रागराग करत आहे. यातच आता खोटी तन्वी म्हणून वावरणारी प्रिया आता पूर्णा आजीचे कान भरण्याचे काम करणार आहे. आश्रमात राहत असताना सायली आपल्याला कशी त्रास द्यायची याचं खोटं चित्र रंगवून ती पूर्णा आजीला सांगणार आहे. तर, यामुळे पूर्णा आजीचा संताप आणखी वाढणार आहे.

Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार काकर खान! समोर आला लूक

दुसरीकडे आता कल्पना पुन्हा एकदा प्रियाची शाळा घेणार आहे. सायलीच्या या व्हिडीओमागे तुझा हात तर नाही ना? असा प्रश्न कल्पना प्रियाला करणार आहे. या आधी सायलीला त्रास दिला तेव्हा तुला एकदा माफ केलं होतं. मात्र, यावेळेस तुला सोडणार नाही, अशी धमकीच कल्पनाने प्रियाला दिली आहे. तर, आपण असं काहीच केलं नाही, असा निर्वाळा प्रियाने दिला आहे. एकीकडे घरात इतका हंगामा सुरू असताना अर्जुन मात्र प्रेमात दिवाना झाला आहे. अर्जुनने सायलीला आपल्या प्रेमाची कबुली दिल्यापासून तो हवेतच आहे. मात्र, सायलीला याची काहीच कल्पना नाही. आता अर्जुन आपली आनंदाची बातमी पहिली चैतन्यला सांगण्यासाठी जाणार आहे.

चैतन्य हा अर्जुनचा फार जवळचा मित्र आहे. अर्जुन आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट चैतन्यला सांगतो. आता आपण आपल्या प्रेमाची कबुली सायलीला दिली आहे, हे सांगण्यासाठी अर्जुन चैतन्यच्या घरी जाणर आहे. इकडे साक्षी खोटं नाटक करून चैतन्यच्या घरीच राहिली आहे. आता अर्जुन चैतन्यच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला मोठा धक्का बसणार आहे. चैतन्य आणि साक्षी एकमेकांना मोठी मारत असतानाच अर्जुन तिथे पोहोचणार आहे. दोघांना एकत्र पाहून आता अर्जुनला धक्का बसणार आहे. साक्षीने आश्रमाच्या केसमध्ये काय काय केलंय, तरी ही इथे का? असा प्रश्न अर्जुन करणार आहे. तर, चैतन्य आपलं साक्षीवर प्रेम असल्याचं सांगणार आहे. मालिकेच्या आजच्या भागात हे वळण पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner