Tharala Tar Mag 11th Jan: अर्जुन सुभेदारच्या प्रयत्नांना यश येणार! सायलीचा रुसवा अखेर दूर होणार-tharala tar mag 11th january 2024 serial update sayali will forgive arjun after seeing his efforts ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 11th Jan: अर्जुन सुभेदारच्या प्रयत्नांना यश येणार! सायलीचा रुसवा अखेर दूर होणार

Tharala Tar Mag 11th Jan: अर्जुन सुभेदारच्या प्रयत्नांना यश येणार! सायलीचा रुसवा अखेर दूर होणार

Jan 11, 2024 04:54 PM IST

Tharala Tar Mag 11th January 2024 Serial Update: अर्जुनने सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र, आता त्याच्या याच प्रयत्नांना यश मिळणार आहे.

Tharala Tar Mag 11th January 2024
Tharala Tar Mag 11th January 2024

Tharala Tar Mag 11th January 2024 Serial Update: गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सुभेदार आपल्या चुकीची शिक्षा प्रामाणिकपणे भोगत आहे. आपल्यावर रागावून रुसून माहेरी निघून गेलेल्या पत्नी सायलीला परत आणण्यासाठी अर्जुनने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. अखेर आता त्याच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. कधी हातात सॉरी बोर्ड घेऊन, तर कधी कान पकडून उठाबशा काढून अर्जुनने सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र, आता त्याच्या याच प्रयत्नांना यश मिळणार आहे.

सायलीचा राग घालवण्यासाठी अर्जुनने फुलं, चॉकलेट, पत्र ते अगदी कान धरून माफी अर्जुनने सगळ्या गोष्टी करून पाहिल्या होत्या. मात्र, तरीही सायलीचा राग काही केल्या जात नव्हता. मात्र, आता अर्जुनच्या एका कृत्यामुळे सायली क्षणात विरघळली आहे. तर, कुसुम ताईंचा राग देखील शांत झाला आहे. चालीची गेलेली लाईट अर्जुनच्या कामी आली आहे. चाळीतील लाईट गेलेली पाहून सायलीची गैरसोय होऊ नये, म्हणून अर्जुनने थेट जनरेटर आणून अख्या चाळीसाठी लाईटची व्यवस्था केली.

Neetu Singh: जया बच्चन पापाराझींशी असं का वागतात? रणबीर कपूरच्या आईने केली पोलखोल!

चाळीत लाईट आलेली पाहून सगळेच चाळवासी खुश झाले आहेत. लाईट आली कशी हे जाणून घेतल्यावर सगळेच सायलीचे आभार मनात आहेत. सायली सुभेदार यांनी जनरेटर आणल्याचे सगळ्यांना सांगितले गेले असल्याने सगळेच खूप खुश आहेत. मात्र, सायलीला या मागचं कारणच कळत नव्हतं. अखेर तिच्या डोक्यात पटकन अर्जुनचा विचार आला आणि तिला या मागे कुणाचं डोकं आहे, ते देखील लक्षात आलं. केवळ आपल्याला त्रास होऊ नये, यासाठी अर्जुन करत असलेली ही मेहनत बघून आता सायलीच्या मनातील रुसवा दूर झाला आहे.

तर, हे लग्न खरं नसलं तरी अर्जुनचं सायलीवर असलेलं प्रेम अगदी खरं आहे, याची खात्री कुसुम ताईंना पटल्यामुळे आता त्या देखील निश्चिंत झाल्या आहेत. आता कुसुम ताईंचा राग देखील पळून गेला आहे. त्यामुळे येत्या भागात आता सायली अर्जुनसोबत घरी जाताना दिसेल का? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Whats_app_banner