Tharala Tar Mag: प्रिया आणि महीपतचं कनेक्शन अर्जुनसमोर येणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्वीस्ट-tharala tar mag 11 september 2024 serial update priya and mahipat s connection will come in front of arjun ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रिया आणि महीपतचं कनेक्शन अर्जुनसमोर येणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्वीस्ट

Tharala Tar Mag: प्रिया आणि महीपतचं कनेक्शन अर्जुनसमोर येणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्वीस्ट

Sep 11, 2024 11:23 AM IST

Tharala Tar Mag 11 September 2024 Serial Update:महीपत आणि प्रियाचे नक्की काय कनेक्शन आहे आणि तो प्रियाला कशासाठी फोन करतोय, असा प्रश्न आता अर्जुनला पडणार आहे.

Tharala Tar Mag 11 September 2024 Serial Update : ठरलं तर मग
Tharala Tar Mag 11 September 2024 Serial Update : ठरलं तर मग

Tharala Tar Mag 11 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एका मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे. नुकतंच या मालिकेत प्रियाला तिच्या वडिलांकडून म्हणजेच रविराज किल्लेदार यांच्याकडून चपराक बसली होती. गणपतीच्या आरती सतत बाधा आणणाऱ्या प्रियाला रविराज यांनी कानाखाली वाजवली होती.  आधीच तिने आरतीसाठी येण्यास उशीर केला होता. यनंतर ती पारोशानेच आरतीचं ताट खेचून घेऊ लागली होती, हे बघून रविराज किल्लेदार चांगलेच संतापले होते. वडिलांकडून चपराक बसल्यानंतर प्रियाची बुद्धी ठिकाण्यावर आली. यावेळी तिने सगळ्यांसमोर सायलीचे माफी मागितली. परंतु, आता सायलीचा बदला घ्यायचा आहे, हे ठरवून तिनं पुढचा प्लॅन आखण्यास सुरुवात केली आहे. 

दुसरीकडे, सुभेदारांच्या घरात मोदकांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रियाने केलेले मोदक बघून सगळ्यांनाच हसू आलं. तर, प्रतिमा आणि सायली यांनी बनवलेले मोदक अगदीच एकसारखे दिसत असल्याने आता दोघींचेही खूप कौतुक होत आहे. सायलीत प्रतिमाची मुलगी असल्यासारखं वाटतं, असं सगळेजण म्हणत आहेत. त्यामुळे प्रिया आता चांगलीच हादरली आहे. परंतु, ही वेळ आता अशीच निघून जाणार आहे.

Tharala Tar Mag: प्रिया पुन्हा तोंडावर पडणार! सायली-प्रतिमा मायलेकी असल्याचा आणखी एक पुरावा समोर येणार

अर्जुन प्रियाशी बोलायला जाणार!

आधीच घरात प्रियाचा इतका अपमान झाला आणि त्यात आपण तिची बाजू देखील घेतली नाही. त्यामुळे तिला आपल्यावर संशय येऊ शकतो, असं अर्जुनला वाटलं होतं. म्हणूनच आता अर्जुन प्रियाची समजूत काढण्यासाठी तिच्या रूममध्ये जाणार आहे. यावेळी तो प्रियाशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, या गप्पांच्या ओघात प्रिया आता तरी सत्य सांगेल का? याकडे अर्जुनचं लक्ष आहे. ‘तू आश्रमात असताना तुझ्या मनातील सगळ्या गोष्टी कुणाला सांगायचीस? कोणासोबत शेअर करायचीस?’, असा प्रश्न अर्जुन प्रियाला विचारणार आहे. ‘आता तू मला तुझा मित्र म्हणून सगळ्या गोष्टी सांगू शकतेस’, असं देखील तो यावेळी तिला म्हणणार आहे. तर लहान असताना तू तुझ्या मनातील सगळ्या गोष्टी विलास काकांना सांगायची का? या प्रश्नावर प्रियाची बोबडी वळणार आहे.

अर्जुनला धक्का बसणार 

प्रिया या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच तिचा फोन वाजणार आहे. त्यावेळी अर्जुन तिला, ‘तू थांब, मी तुझा फोन घेऊन येतो’, असं म्हणून प्रियाचा फोन आणण्यासाठी टेबल जवळ जाणार आहे. प्रियाला येत असलेला फोन हा महीपतचा आहे. तो पुढच्या प्लॅनसाठी तिला फोन करत आहे. आता अर्जुन फोनवरचं नाव बघून चकित होणार आहे. महीपत आणि प्रियाचे नक्की काय कनेक्शन आहे आणि तो प्रियाला कशासाठी फोन करतोय, असा प्रश्न आता अर्जुनला पडणार आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रिया तिला देणार की नाही, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner