मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 11th Mar: संतोषला अडकवण्यासाठी अर्जुन आखणार नवा डाव; सायलीही देणार भक्कम साथ!

Tharala Tar Mag 11th Mar: संतोषला अडकवण्यासाठी अर्जुन आखणार नवा डाव; सायलीही देणार भक्कम साथ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2024 03:38 PM IST

Tharala Tar Mag 11 March 2024 Serial Update: प्रताप सुभेदार यांना ड्रग्जच्या केसमध्ये अडकवून, पुन्हा त्यांच्या जामीनासाठी उभे राहण्याचे नाटक करणारा महिपत आता सुभेदारांसाठी हिरो ठरला आहे.

Tharala Tar Mag 11 March 2024 Serial Update
Tharala Tar Mag 11 March 2024 Serial Update

Tharala Tar Mag 11 March 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अतिशय रंजक वळण पाहायला मिळत आहे. प्रताप सुभेदार यांना ड्रग्जच्या केसमध्ये अडकवून, पुन्हा त्यांच्या जामीनासाठी उभे राहण्याचे नाटक करणारा महिपत आता सुभेदारांसाठी हिरो ठरला आहे. मात्र, अर्जुन आणि सायलीला या षड्यंत्रमागचं सगळं कारण माहिती आहे. प्रताप सुभेदार यांना अटक झाल्यानंतर त्यांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढावे, यासाठी अर्जुनने भरपूर प्रयत्न केले होते. मात्र, अर्जुनला काही कळण्याआधीच महिपतने रविराजची मदत घेऊन प्रतापला जामीन मिळवून दिला. या गोष्टीची थोडीही कल्पना नसलेला अर्जुन धावत तुरुंगात पोहोचल्यावर त्याला सगळ्या गोष्टीची कल्पना आली.

महिपतनीच या सगळ्या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्या आहेत, हे अर्जुनला आधीच माहित होतं. त्यामुळे अर्जुन देखील तडक घरी पोहोचला. इतक्या सगळ्या गोष्टी करून आपल्याच डायनिंग टेबलवर बसून, आपल्याच घरातल्यांसोबत जेवण करत असलेला महिपत पाहून अर्जुनच्या रागाचा पारा वाढला. यामुळे अर्जुन महिपतवर आणखीनच चिडला. मात्र, हीच गोष्ट सुभेदार कुटुंबाला सहन झाली नाही. ‘जेव्हा मला अटक झाली, तेव्हा तू कुठे होतास’, असा प्रश्न अर्जुनच्या वडिलांनी अर्थात प्रताप सुभेदार यांनी अर्जुनला केला. यानंतर, अर्जुनने आपल्या औषध कंपनीत काम करत असलेल्या संतोष नामक व्यक्तीला घरी बोलावून या संदर्भात काही प्रश्न विचारले. मात्र, मी काहीही केलेलं नाही, असे म्हणत त्याने सगळ्या गोष्टी टाळल्या.

Oscars 2024: ‘ऑस्कर २०२४’मध्ये दिग्गजांनी वाहिली नितीन देसाईंना श्रद्धांजली! भारतीयांचे डोळेही पाणावले

याच संतोषला महिपतच्या घरून बाहेर पडताना अर्जुनने पाहिलं होतं. त्यामुळे हे सगळं करण्यात महिपतला साथ देणारा संतोषच होता, हे अर्जुनला ठाऊक आहे. सतत सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असलेला अर्जुन आता सुभेदार कुटुंबासमोर खोटा ठरत आहे. केवळ, सायलीच्या बोलण्यात येऊन अर्जुन घरातल्यांशी असं वागत असल्याचा आरोप आता त्याच्यावर केला जाणार आहे. मात्र, या सगळ्यात सायली त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार आहे.

माझ्यामुळे नाही तर, साक्षी आणि महिपत या बाप लेकीच्या जोडीमुळे घरात या गोष्टी घडत असल्याचे, सायली ठणकावून पूर्णा आजीला सांगणार आहे. आता संतोषकडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुन एक नवीन प्लॅन आखणार आहे. आपल्या या प्लॅनबद्दल तो केवळ सायलीला कल्पना देणार आहे. संतोषकडून खरं वदवून घेण्यासाठी सरळ मार्गा नसेल, मार्ग वाकडा करा असं सायली अर्जुनला सांगणार आहे. आता अर्जुन कोणत्या पद्धतीने संतोषकडून या गोष्टी वदवून घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

IPL_Entry_Point