‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायलीची साडी खराब झाल्याने आता तिला तन्वीच्या खोलीत जाऊन साडी बदलायला लागणार आहे. यानंतर सुमन तिला तन्वीच्या खोलीत घेऊन गेली. तन्वीच्या खोलीत प्रतिमाची साडी समोरच बेडवर ठेवली होती, ते बघून सायलीने प्रतिमाची साडी हाताशी सापडल्याने ती नेसली आणि ती साडी नेसून सायली खाली येणार, इतक्यात नागराजने प्रतिमाच्या फोटोला हार घालायला सुरुवात केली. रविराजला तो फोटोला हार घालायला सांगणार इतक्यात तिकडे सायली आली आणि सायलीला प्रतिमाच्या साडीत बघून पूर्ण आजी तिलाच प्रतिमा समजून बसली. प्रतिमाची साडी नेसून आलेल्या सायलीला प्रतिमा समजून पूर्णा आजी तिचेच लाड करू लागते. हे बघून प्रियाला म्हणजेच खोट्या तन्वीला चांगलाच राग येणार आहे. ती सायलीवर साडी बदलण्यासाठी ओरडणार आहे. तू माझ्या आईच्या साडीला हातच का लावलास? तू हे मुद्दाम केलं, असं म्हणून प्रिया सायलीवर राग काढण्याचा प्रयत्न करते.
मात्र, अर्जुन सायलीची बाजू घेण्यासाठी पुढे येतो आणि हे तिने मुद्दाम केले नसल्याचे म्हणतो. त्यावेळी प्रिया सायलीवर हात उगारते. मात्र, पूर्णाआजी तिचा हात झटकून लावते. पूर्णाआजी म्हणते की, ‘ही साडी तिच्याकडेच असू दे. हिच्या रूपाने माझी प्रतिमा परत आली आहे. प्रतिमाच्या फोटोला पण हार पण नको घालूयात’, असं ती रविराजला देखील सांगते. दुसरीकडे, तन्वी मात्र मनात कचरते आणि म्हणते की, प्रतिमाची खोटी बॉडी मिळवायला आम्ही काय केले ते आमचे आम्हालाच माहित. दुसरीकडे, पूर्णाआजी म्हणते की, कुणाच्या का रुपात होईना प्रतिमाच अस्तित्व जाणवतंय, हेच खूप मोठं आहे. त्यामुळे तिच्या फोटोला कधी हार घालू नका’, असेच संकेत ती देत आहे.
आपल्यासाठी प्रतिमा नेहमीच आपल्यात जिवंत राहणार असल्याचं पूर्णाआजी रविराजला समजावून सांगते. प्रतिभाच्या फोटोला हार घालू नका, यावर पूर्ण आजी ठाम आहे. मात्र, नागराज रविराजला फोटोला हार घालायला सांगतो. तेव्हा, रविराज मात्र त्याला हार घालणार नाही, असं म्हणतो. हे म्हणत असताना तो सांगतो की, ‘भावनांना कधीही मरण नसते. यापुढे कोणीही प्रतिमाच्या फोटोला हार न घालता ती कायम आपल्यात जिवंत आहे, असंच मानायचं.’ रविराजला त्यावेळी प्रतिमाचे सगळे जुने दिवस आठवतात. तितक्यात सायली पूर्णाआजीला औषध द्यायला जाते. त्यावेळेस प्रिया तिला ढकलून आपण आजीची काळजी घेऊ, असं म्हणते. यावर सायली तिला, तू त्या मन:स्थितीत नसल्याचे सांगते.
तर, रविराज पूर्णाआजीला प्रतिमाही अशीच काळजी घ्यायची, असे म्हणतो. रविराज म्हणतो की, प्रतिमाला सगळ्यांचं सगळं काही माहीत असायचं. रविराजचं बोलणं पूर्ण होणार इतक्यात पूर्णाआजी आता सायली असं सगळं करते, असे म्हणते. दोघींमध्ये इतका सारखेपणा जाणवल्यावर रविराज आश्चर्य व्यक्त करतो. मात्र, या दोघींचा काय संबंध आहे, हे समोर आलं तर आपलं काही खरं नाही, असं प्रिया मनाशी पुटपुटते. आता सायलीला स्वयंपाक घरात काम करताना तिचे लहानपणीच्या दिवसांचे भास होणार आहेत. तर, दुसरीकडे ती रविराजला आणि पूर्णाआजीला प्रेमाने खाऊ पिऊ घालणार आहे. हे बघून त्या दोघांनाही हीच तन्वी असल्याचा भास होत राहणार आहे. आता हे सत्य समोर येणार की, नाही हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.