मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सुभेदारांच्या घरचं वातावरण तापलं; सायलीचा राग जाता जाईना! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार?

Tharala Tar Mag: सुभेदारांच्या घरचं वातावरण तापलं; सायलीचा राग जाता जाईना! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार?

Jul 11, 2024 01:51 PM IST

Tharala Tar Mag 11 July 2024 Serial Update:आपला नवरा कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीच्या जवळ जाणार, या विचारांनी सायलीला त्रास होत आहे.

Tharala Tar Mag 11 July 2024 Serial Update
Tharala Tar Mag 11 July 2024 Serial Update

Tharala Tar Mag 11 July 2024 Serial Update: ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनवर रागवताना दिसणार आहे. मात्र, तिला राग का आला आहे, याची अर्जुनला जराही कल्पना नसणार आहे.सायली नक्की का चिडली आहे, तिला नेमकं काय झालं आहे, हे अर्जुनला काहीच कळत नाहीये. खरं तर सायलीला या गोष्टीचा राग आलाय की, अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करणार आहे. सायली ही मनोमन अर्जुनच्या प्रेमात पडलेली आहे. तर, अर्जुन देखील सायलीच्या प्रेमात पडलेला आहे. मात्र, अजूनही दोघांनी एकमेकांना याची कबुली दिलेली नाही. आता पूर्ण आजीने सायलीचा नातसून म्हणून स्वीकार करून, तिच्या हातात घराच्या तिजोरीच्या सगळ्या चाव्या सोपवल्या आहेत.

आता दर महिन्याचा हिशोब चालवण्यासाठी सायलीला अर्जुन, अश्विन आणि प्रताप यांच्याकडून महिन्याचा खर्च मागायचा आहे. मात्र, सायली या गोष्टीसाठी घाबरत आहे. दुसरीकडे सायलीला ही चावी आपल्या ताब्यात मिळाल्याचं देखील वाईट वाटत आहे. ‘मी या घरची सून नाही, या चाव्यांवर माझा काहीही अधिकार नाही. या चाव्या त्याच व्यक्तीच्या हातात जायला हव्या, जी या घरची सून असेल, तर तिचा अधिकार आहे’, असं म्हणत सायली त्या चाव्या पूर्णा आजीला परत करण्यासाठी जाते. मात्र, अर्जुन तिला अडवून म्हणतो की, ‘गेली एक वर्ष तुम्ही या घराची खूप काळजी घेतली आहे. तुमच्यामुळे हे घर सुरळीत चालत आहे. त्यामुळे या चाव्या स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. या चाव्या तुम्ही पूर्ण आजीचा मान म्हणून ठेवत आहात असं हवं तर समजा. पण या चाव्या तुम्ही परत करू नका.’

Suniel Shetty : मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब! व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

सायली नक्की रागावली का?

सायलीला हे सांगत असताना मनोमन अर्जुन म्हणतो की, ‘लवकरच मी तुम्हाला या चाव्या खऱ्या अर्थानं तुमच्या आहेत, याची जाणीव करून देईन.’ आता मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी अर्जुन प्रियासोबत प्रेमाचं नाटक करून तिच्याकडून सत्य वदवून घेणार आहे. अर्जुनने आपला हा प्लॅन सायलीला सांगितला आहे. मात्र, आपला नवरा कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीच्या जवळ जाणार, या गोष्टीने सायलीला त्रास होत आहे. मात्र, सायली अर्जुनला थेट नाही म्हणू शकत नसल्याने, ती आता आपला राग वेगवेगळ्या कृतीतून व्यक्त करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अर्जुनशी वागणार फटकून!

सुभेदार कुटुंब जेवणाच्या टेबलवर बसलेलं असताना अर्जुन सायलीकडे लोणचं मागणार आहे. तर, सायली अर्जुन ऐवजी ते लोणचं आपल्या सासऱ्यांना म्हणजेच प्रताप यांना देणार आहे. तर, अर्जुनच्या कुठल्याही बोलण्याकडे लक्ष न देता सायली सरळ तिथून निघून जाणार आहे. चैतन्यला हा सगळा प्रकार आधीच कळल्यामुळे चैतन्य अर्जुनला कोपरखळी मारणार आहे. ‘आजकाल ग्लोबल वॉर्मिंग फार वाढलं आहे ना... घरातलं तापमान पण वाढलेले दिसतंय’, असं म्हणत तो अर्जुनला सायली चिडल्याचं सांगणार आहे.

WhatsApp channel