मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 10th Dec: बोर्ड पकडला, पत्रही पाठवलं, पण सायलीचा राग जाईना! आता काय करणार अर्जुन?

Tharala Tar Mag 10th Dec: बोर्ड पकडला, पत्रही पाठवलं, पण सायलीचा राग जाईना! आता काय करणार अर्जुन?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 10, 2024 05:04 PM IST

Tharala Tar mag 10Th December 2024 Serial Update: सायलीची समजूत काढण्यासाठी अर्जुन तिच्या दारात सॉरी लिहिलेला बोर्ड घेऊन देखील उभा होता. मात्र, तरीही सायलीने त्याला भाव दिला नाही.

Tharala Tar mag 10th December 2024
Tharala Tar mag 10th December 2024

Tharala Tar mag 10Th December 2024 Serial Update: रागावलेल्या सायलीचा रुसवा दूर करण्यासाठी आता अर्जुन सगळे प्रयत्न करत आहे. आपल्या बोलण्याने दुखावली गेलेली सायली घरी परत यावी यासाठी आता अर्जुनने आता आजूबाजूच्या सगळ्या लोकांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सायली आता कमालीची दुखावली गेली आहे. तिला अर्जुनला भेटायचं देखील नाही. मात्र, आता तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुन इतरही काही प्रयत्न करणार आहे. सायलीची समजूत काढण्यासाठी अर्जुन तिच्या दारात सॉरी लिहिलेला बोर्ड घेऊन देखील उभा होता. मात्र, तरीही सायलीने त्याला भाव दिला नाही.

अर्जुन गेल्या काही दिवसांपासून सायलीचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सायलीला या बद्दल जराही कल्पना नाही. मात्र, एक दिवस बोलण्याच्या ओघात अर्जुन सायलीला सगळं खरं सांगून टाकतो. आता सायलीला हे कळल्यामुळे ती अर्जुनवर रागावली होती. अर्जुनला ती याबद्दल जाब विचारत असताना अर्जुन मात्र तिच्यावर रागावला. रागाच्या भरात त्याने सायलीला काही वाईट शब्द म्हटले. यामुळेच सायली दुखावून गेली होती. तुमच्या आवाजाने देखील मला त्रास होतो, असे अर्जुनने सायलीला म्हटले होते. यामुळे सायली अर्जुनवर चिडली होती.

Omi Vaidya Birthday: ‘थ्री इडियट्स’च नाही तर ‘या’ चित्रपटांमध्येही झळकलाय ओमी वैद्य! तुम्ही पाहिलेत का?

अर्जुनवर रागावून सायली घरातून निघून गेली होती. मात्र, सायली घरात नसल्याने अर्जुन स्वतःच अस्वस्थ झाला आहे. सायली दिसत नसल्याने अर्जुन बैचन झाला होता. आता सायलीला घरी परत आणण्यासाठी अर्जुन आता तिची माफी मागत आहे. सायलीने माफ करावं यासाठी आता अर्जुन सगळे प्रयत्न करत आहे. सायलीला सॉरी म्हणण्यासाठी आता अर्जुन स्वतः तिच्या घरी पोहोचला होता. मात्र, आपल्याला सायलीपर्यंत पोहोचता येत नसल्याने आता अर्जुन सायलीच्या चाळीतील लहान मुलांची मदत देखील मदत घेतली होती.

आता अर्जुन सायलीला एक पत्र आठवणार असून, या पत्रातून तो पुन्हा एकदा तिची माफी मागणार आहे. तर, हे पत्र सायलीच्या हातात पडेपर्यंत अर्जुन कुसुम ताईंच्या घराबाहेरच उभा राहणार आहे. त्याला पाहून आता सायलीला देखील थोडीशी दया येणार आहे. मात्र, ती त्याला माफ करेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel