Tharala Tar Mag: प्रिया पुन्हा तोंडावर पडणार! सायली-प्रतिमा मायलेकी असल्याचा आणखी एक पुरावा समोर येणार-tharala tar mag 10 september 2024 serial update sayali and pratima made same style modak for ganpati ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रिया पुन्हा तोंडावर पडणार! सायली-प्रतिमा मायलेकी असल्याचा आणखी एक पुरावा समोर येणार

Tharala Tar Mag: प्रिया पुन्हा तोंडावर पडणार! सायली-प्रतिमा मायलेकी असल्याचा आणखी एक पुरावा समोर येणार

Sep 10, 2024 02:45 PM IST

Tharala Tar Mag 10 September 2024 Serial Update: सायली हीच प्रतिमाची खरी मुलगी म्हणजेच तन्वी असल्याचं जर समोर आलं तर, आपला सगळा खोटेपणा समोर येईल, याची भीती प्रियाला वाटत आहे.

Tharala Tar Mag 10 September 2024
Tharala Tar Mag 10 September 2024

Tharala Tar Mag 10 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात पुन्हा रंजक कथानक पाहायला मिळणार आहे. सुभेदार कुटुंबात आता मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे. सगळेच अतिशय उत्साहाने बाप्पाला घरी घेऊन आले आहेत. या दरम्यान प्रिया पुन्हा एकदा सायलीशी स्पर्धा करताना दिसणार आहे. सायली हीच प्रतिमाची खरी मुलगी म्हणजेच तन्वी असल्याचं जर समोर आलं तर, आपला सगळा खोटेपणा समोर येईल, याची भीती प्रियाला वाटत आहे. त्यामुळे ती सायलीला प्रतिमापासून सतत दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये.

घरात गणपती बाप्पा बसलेले असतानाही प्रियाचे कारनामे काही केल्या थांबत नाहीयेत. सायलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रियाने दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. मात्र, या झोपेच्या गोळ्या मिसळलेला दुधाचा ग्लास प्रियाला सायलीला देण्याऐवजी स्वतःच घेतला, याची कल्पना तिला देखील नव्हती. झोपेच्या गोळ्यांमुळे प्रियाला सकाळी गाढ झोप लागली आणि यामुळे आरतीला देखील उशीर होत होता. गणपती बाप्पाच्या पहिल्या आरतीचा मान प्रतिमा, रविराज आणि त्यांच्या मुलीला म्हणजेच तन्वीला मिळाला होता. खोटी तन्वी बनवून घरात वावरणाऱ्या प्रियाला मात्र याची काहीही फिकीर नव्हती.

Tharala Tar Mag: प्रिया सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

सायलीला मिळाला आरतीचा मान

गणपती बाप्पाला किती वेळ ताटकळत ठेवायचं, असं म्हणत पूर्णा आजीने अखेर एक निर्णय घेतला. प्रियासाठी थांबण्याऐवजी आपण सायलीला बरोबर घेऊन आरती सुरू करूया, असं पूर्णा आजीने सुचवलं. प्रतिमा सायलीला देखील आपली मुलगीच मानते, त्यामुळे हा मान सायलीच्या हाती द्यावा आणि आरतीची सुरुवात करावी हा पूर्णा आजीचा निर्णय आता सगळ्यांनाच पटला. त्यामुळे प्रतिमा, रविराज आणि सायली यांनी मिळवून गणपती बाप्पाची आरती करण्यास सुरुवात केली. मात्र, आरती सुरू असतानाच प्रियाला जाग आली आणि तिने तडक तिथे येऊन आरतीचे ताट सायलीच्या आतून हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रियाने केलेला हा प्रकार पाहून चिडलेल्या रविराजने सगळ्यांसमोरच तिच्या कानाखाली मारली.

मोदक बनवण्याची स्पर्धा रंगणार

दुसरीकडे प्रतिमा आणि रविराज यांच्यासोबत आरती करत असताना सायलीला तिचा भूतकाळ हळूहळू आठवत आहे. गणपती बाप्पाच्या निमित्ताने सुभेदारांच्या घरात मोदक बनवण्याची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सायली, प्रतिमा, कल्पना आणि प्रिया या चौघीजणी भाग घेणार आहेत. गणपती बाप्पासाठी कोण सगळ्यात सुंदर आणि लवकर मोदक बनवतो, अशी ही स्पर्धा असणार आहेत. यावेळी प्रियाने बनवलेले मोदक पाहून सगळ्यांनाच हसू येणार आहे. तर, सायली आणि प्रतिमा यांनी आपण बनवलेले मोदक दाखवताच सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. दोघींनी बनवलेले मोदक अगदीच एकसारखे दिसत आहेत. या दोघी इतक्या एकसारख्या आहेत की, सायलीच प्रतिमाची मुलगी आहे की काय असं आता मला वाटू लागलं आहे, असं पूर्णा आजी बोलून दाखवणार आहेत. तर, हे ऐकून आता प्रिया चांगलीच घाबरून जाणार आहे.

Whats_app_banner