Tharala Tar Mag 10 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येताना पाहायला मिळणार आहे. प्रियामुळे सुभेदारांच्या घरात आता आधीच एक वादळ आले आहे. प्रियाने प्रतिमाला घरी नेल्यामुळे आता सुभेदारांचे घर रिकामी झाले आहे. प्रतिमा आत्या दिसत नसल्यामुळे घरातील सगळेजण गोंधळून गेले आहेत. सायली आणि अर्जुनला त्रास देण्यासाठी ही चाल प्रियाने खेळली होती. प्रतिमाला सगळ्यांपासून दूर नेलं की, सायली आणि अर्जुनला त्रास होईल, ही गोष्ट प्रतिमाला चांगलीच माहीत होती. त्यामुळे प्रियाने हीच चाल खेळली.
सायली ही प्रतिमा आत्यांच्या अतिशय जवळची होती. मात्र, प्रतिमा आत्या घरातून गेल्याने सायली आता एकटी पडली आहे. सायलीला सतत प्रतिमाची आठवण येत आहे. प्रतिमा आत्या स्वतःच्या घरी परत गेल्याने सायलीला एकाकी वाटत आहे. यातच आता तिला आणखी एक धक्का बसणार आहे. सायली ही अनाथ मुलगी होती. ती ज्या आश्रमात राहत होती, त्या आश्रमाच्या जमिनीवर महीपत शिखरेचा डोळा होता. त्या आश्रमाच्या जमिनीवर एक आलिशान इमारत बांधायची आणि गडगंज पैसा मिळवायचा, असा त्याचा डाव होता. मात्र, आश्रमाचे मालक म्हणजेच मधुभाऊ हे आश्रम विकत नसल्याने, महिपत शिखरेच्या कामात अडथळा येत होता.
आता मधुभाऊंकडून आश्रम विकत घेता येत नाही, तर तो हिसकावून कसा घेता येईल, यासाठी महीपतने प्रियाच्या मदतीने आश्रमात खून घडवून आणला. विलासा खून झाल्यानंतर त्या खुनाचा आळ मधुभाऊंवर टाकण्यात आला. इतकंच नाही, तर याच खुनाच्या आरोपात मधु भाऊंना तुरुंगात देखील धाडण्यात आलं. आपल्या मधु भाऊंना सुखरूप सोडवण्यासाठीच सायलीने अर्जुनची भेट घेतली होती आणि इथूनच दोघांच्या कथेला सुरुवात झाली होती. मधुभाऊंच्या केसमुळेच सायली अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाली होती.
मात्र, आता त्यांचा हा लढा कुठेतरी मोडकळीस येताना पाहायला मिळतोय. अर्जुन आणि सायलीने अनेक प्रयत्न करून आश्रमावर हातोडा चालवण्यावर स्टे आणला होता. मात्र, आता कोर्टाने हा स्टे उठवल्याची नोटीस सायलीच्या हाती आली आहे. आश्रमावरील स्टे हटवल्यामुळे आता महीपत कधीही आश्रम पाडू शकतो, असं देखील या नोटीसमध्ये म्हटलं आहे. आता हे वाचल्यानंतर सायली आणि अर्जुन या दोघांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. आता आश्रम मला वाचवण्यासाठी सायली आणि अर्जुन पुढे काय करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.