‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये आजच्या भागात पोलीस रविराज किल्लेदार यांना फोन करून प्रतिमा आणि त्या डेड बॉडीचा डीएनए मॅच झाल्याचे सांगणार आहे. हे ऐकून रविराज किल्लेदार यांना मोठा धक्का बसणार आहे. त्यावेळेस अर्जुन आणि सायली त्यांना सांभाळणार आहेत. प्रतिमा गेल्याच्या धक्क्याने रविराज किल्लेदार चक्कर येऊन पडणार आहेत. तर, त्यांना सावरत अर्जुन त्यांना शुद्धीवर आणणार आहे. रविराज शुद्धीवर आल्यावर अर्जुन त्यांच्यावर प्रश्नांची बरसात करणार आहे. तुम्हाला फोनवर पोलीस नक्की काय बोलले, याची विचारणा अर्जुन रविराजकडे करणार आहे. त्यावेळी रविराज पोलिसांनी जी डेड बॉडी मिळाली ती प्रतिमाची असल्याचे सगळ्यांना सांगणार आहे. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे.
तर, पूर्णा आजी रडून रडून आपली प्रतिमा गेल्याचं दुःख व्यक्त करणार आहे. दुसरीकडे, आजी आता आपल्याला तन्वीला भेटायचं आहे असं म्हणणार आहे. नंतर सगळे सुभेदार रविराज किल्लेदार यांना घेऊन त्यांच्या घरी जायला निघणार आहेत. इथे रविराज किल्लेदार यांच्या घरात खोटी तन्वी म्हणून राहत असलेली प्रिया आपला प्लॅन सक्सेस झाला की नाही, याचाच विचार करत असते. बाहेर गेलेला रविराज अजून कसा घरी परत आला नाही या विचारात असताना, ती मनात पुढचा प्लॅन आखत असते. तुझ्या खऱ्या बायकोसाठी ही खोटी मुलगी रडण्याचा नाटक नक्कीच करेल, असं ती मनाशी म्हणत असते. इतक्यात तिथे नागराज येतो. तो देखील रविराजच्या परत येण्याची वाट बघत असतो.
आता रविराज घरी परत येणार आहे. घरात पाऊल ठेवतात तो खोट्या तन्वीला म्हणजेच प्रियाला तिची आई प्रतिमा गेल्याचं सांगणार आहे. पोलिसांना मिळालेली डेड बॉडी ही प्रतिमाचीच असल्याचे तो प्रियाला सांगणार आहे. दुसरीकडे, नर्सदेखील डीएनएचं काम फत्ते झालं, असा मेसेज प्रियाला करणार आहे. हे कळल्यानंतर मनातून आनंदून गेलेली प्रिया, ‘आई गेली’, असं म्हणून रडण्याचं नाटक करणार आहे. यानंतर सगळे मिळून प्रतिमाच्या डेड बॉडीवर अंत्यसंस्कार करणार आहेत. खरं तर ही प्रतिमाची डेडबॉडी नाही. हा सगळा प्रियाच्या प्लॅनचा एक भाग आहे.
अंत्यसंस्कार करून घरी परत आल्यानंतर तेल घेऊन पुढे आलेल्या सायलीला प्रिया धक्का देऊन खाली पडणार आहे. त्यामुळे ते तेल सगळं सायलीच्या साडीवर पडणार आहे. मात्र, पुढचे विधी पूर्ण करायचे असल्याने सायली घाईघाईत प्रतिमाची साडी नेसून खाली येणार आहे. सायलीला प्रतिमाच्या साडीत बघून पूर्णाआजी तिला प्रतिमा अशी हाक मारणार आहेत. सायलीमध्ये मला माझी प्रतिमा दिसते, असं त्या म्हणणार आहेत. तू प्रतिमाच्या फोटोला हार घालू नकोस, असं देखील त्या रविराजला सांगणार आहेत. आता पूर्णा आजी सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.