Tharala Tar Mag: प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुनच्या डोक्यात आला नवा प्लॅन; पण सायली मात्र रागावणार!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुनच्या डोक्यात आला नवा प्लॅन; पण सायली मात्र रागावणार!

Tharala Tar Mag: प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुनच्या डोक्यात आला नवा प्लॅन; पण सायली मात्र रागावणार!

Jul 10, 2024 01:57 PM IST

Tharala Tar Mag 10 July 2024 Serial Update: सायलीशी बोलताना आता अर्जुनला एका नवी शक्कल सुचणार आहे. मात्र, अर्जुनच्या या नव्या आयडियावर सायली रागवणार आहे.

Tharala Tar Mag 10 July 2024 Serial Update
Tharala Tar Mag 10 July 2024 Serial Update

Tharala Tar Mag 10 July 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता मधुभाऊंची केस सोडवायचीच असा निर्णय अर्जुनने घेतला आहे. मात्र, मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी प्रियाकडून सत्य काढून घ्यावं लागणार आहे. आता प्रिया खरं कसं सांगेल, त्यासाठी काय करावं असा प्रश्न पडला आहे. सायलीशी बोलताना आता अर्जुनला एका नवी शक्कल सुचणार आहे. मात्र, अर्जुनच्या या नव्या आयडियावर सायली रागवणार आहे. कारण अर्जुनची ही आयडिया म्हणजे प्रियाशी प्रेमाचं नाटक आहे. अर्जुन प्रियाशी प्रेमाचं खोटं नाटक करणार आहे.

प्रियाने काहीच दिवसांपूर्वी आपण किडनॅप झाल्याचा बनाव केला होता. गायब झाल्यावर तिने एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओमध्ये प्रियाने आश्रम केसबद्दल मोठा खुलासा केला होता. या केसमध्ये आपण खोटं बोललो आहे, खोटा जबाब दिला आहे, हे तिने मान्य केलं होतं. आश्रमाच्या खुनाच्या केसमध्ये मधुभाऊ नाही तर, साक्षीचा हात असल्याचे देखील प्रियाने सांगितले होते. साक्षीनेच पैशांचे आमिष दाखवल्यामुळे आपण खोटं बोललो, असं प्रियाने कबूल केलं आहे. आता हेच तिच्याकडून कोर्टात वदवून घ्यावं लागणार आहे. पण, प्रिया खरं कसं बोलेल यासाठी आता अर्जुनला वेगवेगळ्या कल्पना कराव्या लागणार आहे.

Bollywood Nostalgia: संजीव कुमार यांना आधीच माहीत होतं कधी होणार मृत्यू! ‘तो’ शाप ठरला होता खरा

अर्जुनला काय आयडिया सुचली?

आता अर्जुनच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येणार आहे. अर्जुन सायलीशी बोलताना आता म्हणणार आहे की, ‘प्रिया एका वकिलाला सगळं सगळं सांगू शकत नाही. पण, ती हिच गोष्ट, ज्याच्यावर प्रेम करतेय त्याला सांगू शकते. तो व्यक्ती मी आहे. मी जर प्रियाशी प्रेमाचं खोटं नाटक केलं, तर ती सगळ्या गोष्टी मला सांगेल. प्रियाच्या मनात माझ्या विषयी अजूनही प्रेम आहे. तिला अजूनही माझ्याशी लग्न करायचं आहे. त्यामुळे जर मी आता तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं, तर ती सगळं सत्य मला सांगेल. यामुळे मधुभाऊंची केस लगेच सुटेल.’

सायली होकार देणार?

मात्र, आता अर्जुनचा हा प्लॅन सायलीला अजिबात पटलेला नाही. अर्जुन खोटं का होईना पण प्रियासोबत प्रेमाचं नाटक करणार, म्हणजे ते दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवणार. अर्जुन आपला पती आहे, तो असं कसं करू शकतो, हे सायलीच्या मनाला पटत नाहीये. त्यामुळे आता सायली अर्जुनच्या या प्लॅनमुळे नाराज होणार आहे. परंतु, मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवायचे असेल, आपल्याला हे करावंच लागेल, असं म्हणत सायली होकार देणार आहे.

Whats_app_banner