Tharala Tar Mag 1 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना ज्याची प्रतीक्षा होती, ते वळण येणार आहे. अखेर आता अर्जुन आपलं सायलीवरचं प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे. अर्जुनचं सायलीवर असेलेलं प्रेम तो नेहमीच लपवत आला होता. मधुभाऊंच्या केससाठी असलेल्या अटींमध्ये त्याने प्रेमात न पडण्याची अट घातल्यामुळे तो आपलं प्रेम लपवत होता. मात्र, आता प्रियाचा अतिरेक बघून अर्जुन तिला आपल्या मनात फक्त सायली असल्याचं सांगून टाकणार आहे. तर, अर्जुनच हेच बोलणं आता सायलीच्याही कानावर पडणार आहे.
अर्जुन प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी तिच्याशी मैत्री करण्याचं आणि चांगलं वागण्याचं नाटक करत आहे. मात्र, प्रिया या सगळ्याला खरं समजून बसली आहे. आता अर्जुनने प्रियाच्या पायावर कोणतीही जन्म खुण नसल्याचं देखील पडताळून घेतलं आहे. म्हणजेच प्रिया ही खोटी तन्वी आहे, हे सत्य आता अर्जुनला कळलं आहे. त्यामुळे तो प्रियाचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणण्याचा नवा प्लॅन करत आहे. अर्जुनने प्रियाच्या पायात पैंजण घालण्याच्या बहाण्याने तिच्या तळपायावर जन्मखुण आहे का हे तपासून घेतलं होतं. त्यामुळे आता त्याचा प्रियावरचा संशय आणखीनच बळावला आहे. मात्र, आता प्रिया अर्जुनच्या आणखीनच जवळ जायला बघत आहे.
घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन आता प्रिया अर्जुनसाठी डिनर डेट प्लॅन करणार आहे. प्रियाचा हा प्लॅन अर्जुनला अजिबातच माहीत नाही. त्यामुळे तो स्वतःच्या कामात व्यस्त असणार आहे. मात्र, आता काहीतरी कारणासाठी खोली बाहेर आलेल्या अर्जुनला प्रियाचा हा प्लॅन कळणार आहे. घरात सगळेकडे लाल बदामाच्या आकाराचे फुगे, समोर टेबल, त्यावर मेणबत्ती अशा या वातावरणात प्रिया अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, प्रियाच्या या वागण्यामुळे अर्जुन तिच्यावर चिडणार आहे. तर, प्रिया आता अर्जुनचा हात पकडून ‘मला आयुष्यभर तुझ्यासोबत या घरात राहायचं आहे’, असं म्हणणार आहे.
आता मात्र, अर्जुनचा संताप अनावर होणार आहे. मिठी मारण्याचा प्रयत्न करत असलेल्या प्रियाला पाहून अर्जुन तिला दूर ढकलून देणार आहे. तर, ‘माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. मी या जगात फक्त एका व्यक्तीवर प्रेम करतो ती माझी बायको सायली आहे’, असं प्रियाला सांगणार आहे. अर्जुन आणि प्रियाचे हे वाद सुरू असतानाच अचानक सायली तिथे येणार आहे. दार बाहेर उभ्या असेलल्या सायलीच्या कानावर आता अर्जुनचे हे शब्द पडणार आहेत. अर्जुनचं आपल्यावर प्रेम आहे, हे ऐकून आता सायली खूप खूश होणार आहे.