Tharala Tar Mag 1 March 2024 Serial Update: सध्या ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अतिशय यशस्वी ठरली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपी स्गार्यातीत देखील अव्वल आली आहे. आता देखील या मालिकेतील धक्कादायक वळणांमुळे मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अर्जुनच्या मागे लागलेलं संकटांचं शुक्लकाष्ट संपण्याचं नावच घेत नाहीये. सतत परिस्थितीशी झुंज देणाऱ्या अर्जुनसमोर रोज नवनवीन संकटं उभी ठाकत आहेत. एकीकडे जिवाभावाच्या मित्राने अर्थात चैतन्यने साथ सोडल्यानंतर आता अर्जुनच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे.
अर्जुनचे वडील अर्थात प्रताप सुभेदार यांची एक औषध कंपनी आहे. याच कंपनीच्या एका गाडीमध्ये नार्कोटीक ड्रग्ज आढळल्याने आता प्रताप सुभेदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, हे ड्रग्ज प्रताप सुभेदार यांच्या गाडीत नेमके आले कुठून असा प्रश्न सगळ्या सुभेदार कुटुंबाला पडला आहे. याचा शोध घेत असताना आता अर्जुनला याचा सुगावा लागणार आहे. आपल्या वडिलांच्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून त्यांना फसवण्याचं काम साक्षी आणि महिपत शिखरे यांनीच केल्याचे अर्जुनसमोर उघड होणार आहे. अर्जुनला आधीपासूनच या गोष्टीचा संशय होताच. त्यामुळे पोलिसांनी प्रताप सुभेदार यांना अटक केल्यानंतर अर्जुन तडक साक्षीच्या घरी पोहोचणार आहे.
साक्षीच्या घरी अर्जुनला सगळ्या ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा होणार आहे. इकडे घरात बसून साक्षी आणि महिपत कसे आपण त्या गाडीत ड्रग्ज ठेवून प्रताप सुभेदार याला त्यात अडकवलं याची चर्चा करत आहेत. यावेळी महिपत शिखरे साक्षीला सगळा प्लॅन कसा रचला आणि पूर्ण केला हे सांगणार आहे. महिपत शिखरे यानेच एका व्यक्तीकडून ड्रग्ज विकत घेऊन, ते ड्रग्ज प्रताप सुभेदार यांच्या कंपनीच्या गाडीत ठेवले होते. यानंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून प्रताप सुभेदार ड्रग्जची तस्करी करत असल्याची तक्रार केली होती. पोलिसांना फोन करून आपण समाज सुधारक असल्याचे म्हणत, ही घाण समाजातून समूळ नष्ट करता यावी म्हणून पोलिसांना ही माहिती देत असल्याचे तो सांगतो.
महिपत शिखरे साक्षीला या गोष्टी सांगत असतानाच तिथे अर्जुनची एन्ट्री होणार आहे. साक्षी आणि महिपत यांनी रचलेला हा डाव अर्जुनच्या कानी पडल्यामुळे त्याला सगळं सत्य कळणार आहे. महिपत इतक्या खालच्या पातळीवर उतरलेला पाहून अर्जुनचा संताप अनावर होणार आहे. चिडलेला अर्जुन आता थेट महिपतची कॉलर पकडून त्याला जाब विचारणार आहे.
संबंधित बातम्या