मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 1st Jan: सायली आणि अर्जुनमध्ये होणार मोठं भांडण! ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार ट्वीस्ट

Tharala Tar Mag 1st Jan: सायली आणि अर्जुनमध्ये होणार मोठं भांडण! ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 01, 2024 08:03 PM IST

Tharala Tar Mag 1 January 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन आता एकमेकांशी शुल्लक कारणांवरून भांडताना दिसणार आहेत. तर, यानंतर सायली देखील अर्जुनला धमकी देणार आहे.

Tharala Tar Mag 1 January 2024
Tharala Tar Mag 1 January 2024

Tharala Tar Mag 1 January 2024 Serial Update:ठरलं तर मग’ मालिकेच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना या मालिकेत जबरदस्त वळण पाहायला मिळणार आहे. इतके दिवस एकमेकांशी हातचं राखून वागणारे सायली आणि अर्जुन आता पहिल्यांदाच जोरदार भांडण करताना दिसणार आहेत. सायली आणि अर्जुन आता एकमेकांशी शुल्लक कारणांवरून भांडताना दिसणार आहेत. तर, यानंतर सायली देखील अर्जुनला धमकी देणार आहे. या दोघांमधील भांडणाने आता कथानकाला नवं वळण मिळणार आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सायली अर्जुनवर चिडून त्याला ओरडताना दिसली आहे. सायलीचा भूतकाळ या दोघांमधील वादाचं कारण ठरणार आहे. मधुभाऊंची केस सोडवताना अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. हीच गोष्ट आता सायलीला कळली आहे. अर्जुन आपला भूतकाळ का शोधात असावा, असा प्रश्न सायलीला पडला आहे. तर, याच गोष्टीमुळे सायली अर्जुनवर नाराज झाली आहे. तिला अर्जुनचा राग आला आहे. आता हाच राग ती अर्जुनवर काढणार आहे.

Madhuri Dixit: निळ्याशार साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज! माधुरी दीक्षितचे नवे फोटो पाहिलेत?

अर्जुनने बेडवर पसरून ठेवलेलं सामान पाहून आता सायलीला त्याचा खूप राग येणार आहे. ओला टॉवेल बेडवर ठेवण्याची ही काही जागा आहे का? पुस्तकसुद्धा अशीच पसरवून ठेवली आहेत. पुन्हा तुम्ही घरात पसारा करून सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलं आहे, असं म्हणत सायली त्याच्यावर चिडणार आहे. तर, सायलीची बडबड ऐकून अर्जुनला देखील थोडासा राग येणार आहे. त्यामुळे तो देखील आता तिच्यावर रागवणार आहे. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगणार आहे.

वैतागलेला अर्जुन सायलीवर ओरडणार आहे. मी कामात आहे, उगीच माझ्यकडे येऊन बडबड करू नका, मला शांती हवी आहे, माझ्याशी बोलू नका, असं एका दमात अर्जुन बोलणार आहे. तर, सायली देखील यापुढे मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही, असं म्हणून अर्जुनला धमकी देणार आहे. मालिकेच्या नव्या भागांमध्ये हे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel