Tharala Tar Mag 1 Feb 2024 Serial Update: अर्जुन सुभेदार आणि सायली दोघेही सध्या हनिमूनसाठी माथेरानला गेले आहेत. अर्जुन आणि सायलीच्या पाठोपाठ प्रिया देखील माथेरानला पोहोचली आहे. नुकतीच सायली स्विमिंगपूलमध्ये पडलेली पाहायला मिळाली होती. आजच्या भागात अर्जुन सायलीची खास काळजी घेताना दिसणार आहे. पाण्यात पडल्यामुळे घाबरलेल्या सायलीला अर्जुन आता दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. सायली पूलमध्ये कशी पडली हे जाणून घेण्याचा प्रयत्न अर्जुन करत आहे. तर, कुणाचा तरी धक्का लागल्याने पाण्यात पडल्याचे सायली यावेळी सांगणार आहे. मात्र, अर्जुन यामुळे काळजीत पडणार आहे.
दुसरीकडे, पूर्णा आजी आता सुभेदारांच्या घरी परतल्या आहेत. पूर्ण आजीने घरात येताच सायली आणि अर्जुनबद्दल विचारणा करू लागल्या आहेत. मात्र, सायली आणि अर्जुन नेमके कुठे आहेत, हे कुणीच पूर्णा आजीला सांगत नाहीये. मात्र, आता अस्मिता पूर्णा आजीला सायली आणि अर्जुनच्या हनिमूनबद्दल सांगणार आहे. तर, हे ऐकून आता पूर्णा आजी संतापणार आहे. सायली आणि अर्जुन कुणालाही न सांगता हनिमूनला गेले, असे पूर्णा आजीला वाटत आहे. मात्र, आता कल्पना मध्ये पडून आजीला सगळं खरं सांगणार आहे. आता कल्पनानेच दोघांना पाठवलं आहे, हे ऐकून पूर्णा आजीचा राग देखील शांत झाला आहे. मात्र, आजी काहीच बोलत नाही, हे बघून आता अस्मिताचा संताप होणार आहे.
तिकडे माथेरानमध्ये अर्जुन सायलीची भरपूर काळजी घेत आहे. पाण्यात पडल्यामुळे घाबरलेल्या सायलीला थोडीशी शांती मिळावी, म्हणून अर्जुन माथेरान फिरवण्यास नेणार आहे. यावेळी अर्जुन स्वतः सायलीसाठी खास घोडा घेऊन येणार आहे. यावेळी अर्जुन खऱ्याखुऱ्या नवऱ्यासारखं वागत असल्याचं पाहून सायलीची चिडचिड होत आहे. मात्र, अर्जुन सायलीपुढे मैत्रीचा हात करणार आहे. त्यामुळे आता सायली देखील अर्जुनला आपला मित्र मानू लागणार आहे. दुसरीकडे, कुसुम ताई सायलीला फोन करून अर्जुनबद्दल वाईटसाईट बोलायला सुरू करणार आहे. मात्र, यावेळी सायलीलाच तिचा राग येणार आहे. अर्जुन सर तुला वाटतात तसे नाहीत, असे बोलून सायली कुसुम ताईंचा फोन ठेवून देणार आहे.
प्रिया सतत लपूनछपून सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवत आहे. मात्र, दोघांचा हा रोमान्स पाहून प्रियाचा जळफळाट होत आहे. सायलीला हानी पोहचवण्यासाठी प्रिया आणि अस्मिता वेगवेगळे प्लॅन्स तयार करत आहेत. मालिकेच्या येत्या भागात दोघींचा नवा प्लॅन पाहायला मिळणार आहे.