लोकेश कनकराज दिग्दर्शित 'लिओ' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही प्रेक्षकांना थलपती विजयचा हा चित्रपट फिका वाटला तर काहींना तो आवडला. आता चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे चला जाणून घेऊया...
'लिओ' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी ६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच चित्रपटाने ग्रॉस ७४ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनने ३० कोटी रुपये कमावले आहेत. केरळमध्ये चित्रपटाने ११ कोटी रुपये कमावले, कन्नड व्हर्जनने १४ कोटी, आंध्र आणि तेलंगणा येथे चित्रपटाने १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील कमाई विषयी बोलायचे झाले तर चित्रपटाने १४० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: थलपती विजयचा 'लिओ' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू
लिओ चित्रपटाने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमाच्या तुलनेत कमी आहे. अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता लिओने ६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर पठाणने ५७ कोटी रुपये कमावले. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत शाहरुखचा जवान सरस ठरला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालनने ट्वीट करत माहिती दिली की लिओ या चित्रपटाला पायरसीचा झटका बसला आहे. हाय क्वालिटीमध्ये चित्रपट लीक झाला आहे. मनोबाला यांनी ट्वीटमध्ये पायरेटेड साइटवरील चित्रपटाचा थिएटर व्हर्जन नाही तर क्वालिटी व्हर्जन लिक केले. चित्रपट लिक झाल्यामुळे कमाईवर याचा परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या